पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या


शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या पहिल्या पत्नीबाबत अनेक खुलासे केले होते, ज्यामुळे तो चर्चेत आला होता. तर अलीकडेच त्याला मुंबई क्राइम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे की, तो अश्लील चित्रपट ऍप्सवर दाखवतो. नुकतेच या पोर्नोग्राफी प्रकरणाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचला आणखी एक यश मिळाले आहे. शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर, सुमारे १० तासानंतर क्राइम ब्रांचने नेरुळ भागातून रयान थारप नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह एकुण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०२१मध्ये राज कुंद्राविरुद्ध नोंदवली गेली होती तक्रार
सोमवारी १९ जुलैच्या रात्री, राज कुंद्राला क्राइम ब्रांचने अटक केली आहे. अश्लील चित्रपट बनवून काही ऍप्सवर दाखविल्याचा आरोप राजवर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलमध्ये दीर्घ चौकशीनंतर राज कुंद्राला अटक करण्यात आली. तसेत राज कुंद्राविरोधात फेब्रुवारी २०२१ मध्येच तक्रार दाखल करण्यात आली होती. (pornography case crime branch arrested ryan tharp was arrested yesterday in this case)

संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे राज कुंद्रा
मुंबई क्राइम ब्रांचने म्हटले आहे की, राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. राज कुंद्रा आणि ब्रिटनमध्ये राहणारा त्याचा भाऊ यांनी मिळून केनरिन नावाची कंपनी स्थापन केली आहे. ज्यावर अश्लील चित्रपट दाखवले जातात. चित्रपटांचे व्हिडिओ भारतात शूट करण्यात येत होते आणि ते व्ही ट्रान्सफरच्या माध्यमातून परदेशात पाठविण्यात येत होते.

मंगळवारी न्यायालयात व्हावे लागेल हजर
मुंबई क्राइम ब्रांचची टीम मंगळवारी राज कुंद्राला न्यायालयात हजर करेल. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे राज कुंद्राविरूद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. तसेच पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामतलाही अटक केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आषाढी निमित्त गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद

-‘सावळे सुंदर रूप मनोहर’ गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंगमध्ये

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.