Friday, October 17, 2025
Home साऊथ सिनेमा दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी उल्लेख केलेले राज बहादुर नक्की आहेत तरी कोण?

दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी उल्लेख केलेले राज बहादुर नक्की आहेत तरी कोण?

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा ५१ वा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सुपरस्टार रजनीकांत यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, त्यांचे मित्र, परिवार आणि चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आपल्या आवडत्या कलाकाराला एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे चाहते खूप खुश आहेत. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी एका खास व्यक्तीचे नाव घेऊन त्या व्यक्तीचे आभार मानले आहे. ती व्यक्ती म्हणजे राज बहादुर. हे नाव ऐकल्यावर अनेकजण विचारात होते की, नेमके राज बहादुर आहेत तरी कोण? याआधी चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा कधी उल्लेख झाला नाही. चला तर आज जाणून घेऊया रजनीकांत यांच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

राज बहादुर हे बंगळूरुमधील एक निवृत्त बस ड्राइव्हर आहेत. हे तेच आहेत ज्यांनी रजनीकांत यांच्यातील अभिनयाचे गुण ओळखून त्यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रवृत्त केले होते. रजनीकांत हे सुरुवातीला एक बस कंडक्टर होते. त्यावेळी त्या दोघांची मैत्री झाली आणि तिथूनच काम करता करता त्यांना रजनीकांत यांच्यामध्ये भविष्यातील एक सुपरस्टार दडलेला दिसला आणि त्यांना रजनीकांत यांना अभिनय करण्याचा सल्ला दिला. (Raj bahadur was a bus driver of Bangaluru, Rajinikanth took name while receiving Dadasaheb falake award)

रजनीकांत म्हणाले की, “मी जेव्हा बस कंडक्टर होतो तेव्हा त्यांनी माझ्यातील अभिनयाचे टॅलेंट ओळखले आणि मला चित्रपटात येण्यासाठी प्रवृत्त करून हिंमत दिली.” रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार स्विकारल्यानंतर राज बहादुर यांनी लगेच आनंदाने त्यांची बॅग भरायला घेतली आणि ते रजनीकांत यांना भेटण्यासाठी चेन्नईला रवाना झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना राज बहादुर यांनी सांगितले की, “दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना त्याने माझे नाव घेणे हे काही जास्त गरजेचे नव्हते. परंतु यावरून त्याच्यातील कृतज्ञता दिसून येते की, तो त्याच्या मित्राला आणि त्याचा प्रवास विसरला नाही. जेव्हा केव्हा तो त्याच्या परिवाराला भेटतो तेव्हा तो त्यांना मला देखील भेटवतो.”

राज आणि रजनीकांत यांच्या मैत्रीला ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. १९७० मध्ये त्यांची पहिल्यांदा ओळख झाली होती, त्यावेळी राज बहादुर हे बस ड्राइव्हर होते तर रजनीकांत हे बस कंडक्टर होते. याबद्दल माध्यमांशी बोलताना राज बहादुर म्हणाले की, “तेव्हा तो इतरांप्रमाणेच माझ्यासाठी एक कंडक्टर होता. परंतु मला त्याच्यातील ती ऊर्जा दिसली होती. त्याला या क्षेत्रात काम करताना बघण्याची आमची सगळ्यांचीच खूप इच्छा होती. एक दिवस मला त्याला सांगितले की, त्याच्यात अभिनय करण्याचे ते खास टॅलेंट आहे आणि त्याला चित्रपटात जाण्यास काहीही हरकत नाही. परंतु त्यावेळी त्याला चित्रपट आणि अधिकृत अभिनय करणे यात अजिबात रस नव्हता. परंतु हे सगळं करण्यास मी त्याला प्रवृत्त केलं आणि चेन्नईमधील मद्रास फिल्म सिटीला भेट देण्यास सांगितले.”

इथून पुढेच रजनीकांत यांचे आयुष्य चमकले आणि एका कंडक्टरपासून ते एक सुपरस्टार झाले. त्यांच्या या यशात अनेकांचा वाटा आहे परंतु एका अनोळखी व्यक्तीने मित्र बनून त्याने त्यांना या क्षेत्रात येण्यास सांगितले यासाठी रजनीकांत यांचा आजही त्यांचा तेवढाच आदर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा