Saturday, July 6, 2024

‘शोमॅन’ राज कपूरपासून ते ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमारपर्यंत ‘हे’ अभिनेते जन्मलेत पाकिस्तानात, बॉलिवूडमध्ये वाजवलाय आपल्या नावाचा डंका

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा जन्म भारतात नव्हे तर पाकिस्तानमध्ये झाला आहे. पण पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या या सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक नामांकित स्टार आणि सुपरस्टार्सचा समावेश आहे. वास्तविक, फाळणीमुळे दोन्ही देशांचे भाग्य बदलले. जेव्हा देशाची सीमा आखली जात होती, त्यावेळी बॉलिवूडचे अनेक कलाकार, पाकिस्तानमधून भारताच्या दिशेने आले होते. अशाच काही कलाकारांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांचा शेजारच्या पाकिस्तान देशाशी खास संबंध आहे.

राज कपूर
बॉलिवूडचे ‘शोमॅन’ राज कपूर यांचा जन्म पाकिस्तानच्या पेशावर येथे झाला होता. ज्या हवेलीमध्ये ते जन्मले होते, ती जवळजवळ 100 वर्षे जुनी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

दिलीप कुमार
‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार, यांचे पाकिस्तानमधील पेशावर येथे वडिलोपार्जित घर आहे. पेशावर येथे जन्मलेले दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान आहे. दिलीपकुमार यांना अभिनय व शानदार कामगिरीबद्दल ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचवेळी त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ देखील देण्यात आला आहे.

देव आनंद
बॉलिवूडचे पहिले ‘रोमँटिक हिरो’ म्हणून ओळखले जाणारे देव आनंद हे भारतीय सिनेमाचे सदाबहार अभिनेते आहेत. देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी गुरदासपूर (पाकिस्तानमधील नारोवाला जिल्हा) येथे झाला. मात्र, त्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात आले आहेत.

सुनील दत्त
बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त यांनी चाहत्यांना हिंदी चित्रपटातील अनेक उत्तम पात्र दिले. मोठ्या पडद्यावर दरोडेखोरांची भूमिका साकारणाऱ्या सुनील दत्त यांनी, अनेक मजेदार पात्रे साकारून आपण बहुमुखी अभिनेता असल्याचे सिद्ध केले. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक सुनील दत्त यांचा जन्म झेलम जिल्ह्यातील खुर्द गावात झाला होता, जो आता पाकिस्तानचा भाग आहे.

अमरीश पुरी
बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांबद्दल बोलताना, अमरीश पुरी यांचे नाव सर्वप्रथम येते. खलनायक म्हणून अमरीश पुरी यांनी स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली. थिएटर आणि चित्रपटांमध्ये आपली ओळख निर्माण करण्याशिवाय, परदेशी रंगमंचावरही त्यांची वेगळी ओळख होती. अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून, 1932 रोजी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या ९ महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश

-‘लाखो दिलों की धडकन!’ रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील ‘ते’ सत्य, जे कोणालाही माहित नाही; सुंदर हास्यामागे आहेत बऱ्याच वेदना

-‘कर्नाटक क्वीन’ ते ‘नॅशनल क्रश’ असा होता रश्मिका मंदानाचा सिनेसृष्टीतील प्रवास

हे देखील वाचा