Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड पती राज कौशलच्या वाढदिवशी मंदिराने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, ‘ही पोकळी कधीच भरू शकणार नाही…’

पती राज कौशलच्या वाढदिवशी मंदिराने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, ‘ही पोकळी कधीच भरू शकणार नाही…’

टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री असलेल्या मंदिरा बेदीसाठी मागील काही महिने खूपच आव्हानात्मक आणि क्लेशदायी होते. ३० जून, २०२१ ला तिचे पती असलेल्या राज कौशल यांचे अचानक हृदयविकाराच्या धक्काने दुःखद निधन झाले, आणि मंदिरावर दुःखांचा जणू डोंगरच कोसळला. मात्र, ते म्हणतात ना ‘शो मस्ट गो ऑन’ अगदी तसेच मंदिराने सत्य स्वीकारले आणि हळूहळू पुढे चालायला सुरुवात केली.

पतीच्या निधनानंतर सोशल मीडियापासून लांब गेलेली मंदिर आता पुन्हा सोशल मीडियावर परतली आहे. ती सोशल मीडियावर अनेकदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो, आठवणी शेअर करताना दिसते. रविवारी (१५ ऑगस्ट) मंदिराच्या पतीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मंदिराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (Raj Kaushal Birth Anniversary)

मंदिराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा आणि राज यांचा एक जुना फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले, “१५ ऑगस्ट नेहमीच माझ्यासाठी खास होता. अगदी एखाद्या सणासारखे. स्वातंत्र्य दिवस आणि राजचा वाढदिवस. हॅप्पी बर्थडे राजी…आम्हाला तुझी खूपच आठवण येत आहे, आणि आशा करते तू आम्हाला बघत असशील आणि नेहमीच आमच्यासोबत असशील. ही पोकळी कधीच भरू शकणार नाही. आशा करते तू एका खूप चांगल्या ठिकाणी असशील. शांती आणि खूप प्रेम.”

मंदिराच्या या पोस्टवर फॅन्ससोबतच इंडस्ट्रीमधील तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनी कमेंट्स करत तिचे मनोबल वाढवले आहे. यात मौनी रॉय, गुल पनाग, हंसिका मोटवानी आदी अनेक कलाकारांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी मंदिराने राज यांना जाऊन एक महिना झाल्याने घरात एक पूजा देखील ठेवली होती. या पूजेत मंदिरा तिच्या मुलांसह सहभागी झाली होती. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी मंदिरा आणि राजच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. मंदिराने आता तिचे सामान्य आयुष्य हळूहळू जगायला सुरुवात केली आहे. तिने आता तिच्या कामाला सुद्धा सुरुवात केली असून, त्याची देखील एक पोस्ट शेअर केली होती.

मंदिरा आणि राज यांना एक मुलगा असून, त्यांनी त्यांच्या मुलीला दत्तक घेतले होते. नुकतीच मंदिराने तिचा पाचवा वाढदिवस साजरा केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा