सराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेता अशोक सराफ यांच्या मराठी चित्रपटातील कारकिर्दीसाठी त्यांना अनेक पुरस्काराने तर सन्मानित केलंच आहे. मात्र त्यांच्या येत्या (दि, 4 जून) रोजी अभिनेता आपला 75 वाढदिवस साजरा करतील त्यामुळे त्यांच्या वाधदिवसाच्या औचित्या साधून पुण्यात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकेर देखिल उपस्थित असून त्यांनी अशोकजींच तोंड भरुन कौतुकही केलं. राज ठाकरेंच्या मते, ‘अभिनेता दक्षिणमध्ये असते तर, आज ते मुख्यमंत्री असते.’
रविवार (दि, 8 जानेवारी) रोजी अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून पुण्यामध्ये एक विशेष कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये राज ठाकरे देखिल उपस्थित होते. त्यांनी अशोकजींचे कौतुक करत राज ठारे म्हणाले की, “परदेशात कलावंतांच्या नावाने विमानतळं असतात. आपल्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. आपल्याकडे प्रतिमा जेवढी जपली जाते तेवढी प्रतिभा जपली जात नाही. मी अशोक सराफ यांचा कलावंत म्हणून नेहमीच आदर करत आलो. इतकी वर्षं लोकांना भूरळ घालणं तसेच सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं सोपी आणि साधी गोष्ट नाही. अशोक सराफ युरोपात असते तर त्यांच्या स्वागतासाठी आज मंचावर पंतप्रधान असते.”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “समोर कोणीही कलाकार असू देत अशोक सराफ यांना काहीही फरक पडला नाही. कोणत्याही चित्रपटात, नाटकामध्ये त्यांनी स्वत:चा प्रभाव कायम ठेवला. ही काही साधी गोष्ट नाही. मी त्या दिवशी त्यांचं व्हॅक्यूम क्लिनर नाटक पाहिलं. त्यांच्या प्रवेशाला नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. 50-60 वर्षं स्वत:मधील कुतहूल जागं ठेवणं ही साधीसुधी गोष्ट नाही.”
काल मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या 'धक्क्याने' नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आली. पण वयाची ७५ पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं. pic.twitter.com/QwJ1wbxSmz
— Raj Thackeray (@RajThackeray) November 1, 2022
राज ठाकरे हे राजकारणाशिवाय मनोरंजन क्षेत्रामध्येही सक्रिय होत आहेत. अशोक सराफांच व्हॅक्युम क्लीनर नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी असोक मामांच कौतकही केलं होतं. नुकत्या पार पडलेल्या कार्यक्रमातही त्यांनी अशोकजींचे तोंडभरुन कौतुक करुन जर दक्षिणमध्ये असते तर ते मुख्यमंत्री असं राज ठाकरेंच मत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या विजेता जाहीर
फरहान अख्तरच्या आधी ‘या’ कलाकारांनाही घटस्फोटानंतर मिळाले खरे प्रेम, ‘या’ अभिनेत्याने केली आहेत तीन लग्न