Friday, July 5, 2024

ऐश्वर्या रायने नकार दिलेल्या या सिनेमामुळे करिश्मा कपूर झाली सुपरस्टार, जाणून घ्या त्या सिनेमाबद्दल

करिश्मा कपूर हे बॉलिवूडमधील असे नाव आहे, ज्याच्याशिवाय पुढे जाणे कोणालाही शक्य होणार नाही. करिश्माने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने हिंदी चित्रपटांचे ९० चे दशक तुफान गाजवले. कपूर खानदानातून येऊनही करिश्माला यश मिळवण्यासाठी आणि या इंडस्ट्रीमध्ये टिकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. वयाच्या केवळ १५ व्या वर्षी तिने चित्रपटांमध्ये पाऊल टाकले. अभिनयाच्या वेडामुळे तिने तिचा अभ्यास मधेच सोडला. १९९१ साली आलेल्या ‘प्रेमकैदी ‘ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिच्यासोबत हरीश कुमार मुख्य अभिनेता होता.

करिश्माला तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणवर लोकांच्या मजाकला सामोरे जावे लागले. कोणी तिला मुलांसारखी दिसते म्हटले तर कोणी तिला लेडी रणधीर कपूर म्हटले. मात्र जेव्हा ‘राजा हिंदुस्थानी’ सिनेमा आला तेव्हा या सिनेमात लोकांनी तिला पाहिले आणि सर्वांचे तोंड बंद झाले. या सिनेमात ती खूपच सुंदर दिसली. तिचे ग्लॅमर आणि बोल्डनेस पाहून सर्वच शांत झाले. हाच सिनेमा तिच्या करियरचा टर्निंग पॉइंट ठरला. हा सिनेमा हिट तर झाला सोबतच या सिनेमांतील गाणी, संगीत, कलाकार तुफान गाजले. एका रात्रीत या चित्रपटाने करिश्माला स्टार केले.

करिश्माला सुपरस्टार अभिनेत्री बनवणाऱ्या या सिनेमाबद्दल तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहित नसेल की, हा सिनेमा आधी अभिनेत्री ऐश्वर्या रायला ऑफर झाला होता. जेव्हा ऐश्वर्याने हा सिनेमाला नकार दिला तेव्हा करिश्माला सिनेमासाठी विचारणा झाली आणि ती होकार दिला. याच एका होकाराने तिचे नशीब बदलले. जेव्हा हा सिनेमा ऐश्वर्यला ऑफर झाला तेव्हा ती शिक्षण घेत होती, म्हणून तिने नकार दिला. पुढे या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड तयार केले. सिनेमात असणारा करिश्मा आणि आमिर खानचा किसिंग सिन खूपच वादात अडकला होता. या सिनेमामुळे करिश्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिन्मय मांडलेकरने हिंदी चित्रपटांना नकार देण्यामागचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये…’
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ज्युलियन सँड्स अमेरिकेमध्ये हायकिंग करताना बेपत्ता

हे देखील वाचा