राजेश खन्ना हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न. राजेश खन्ना यांनी त्यांच्या मोठ्या कारकिर्दीमध्ये अतिशय मोठे आभाळाएवढे यश पाहिले. एकापेक्षा एक सुंदर, आशयसंपन्न आणि हिट सिनेमे त्यांनी बॉलीवूडला दिले. राजेश खन्ना नुसते नाव जरी उच्चारले तरी त्यांच्या हिट सिनेमांची नावे सर्रकन नजरेआड होतात.1969ते 1971 या तीन वर्षांच्या काळात त्यांनी 15सिनेमे लागोपाठ हिट दिले. त्यांचे यश आणि लोकप्रियता बघता, प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला त्यांच्यासोबत काम करायचे होते. त्यांच्या घराबाहेर दिग्दर्शकांची रांग लागलेली असायची. प्रत्येकालाच वाटायचे की, राजेश खन्ना यांनी त्यांच्या सिनेमात काम करावे. सिनेमात राजेश खन्ना म्हटले की, तो सिनेमा प्रदर्शनाआधीच हिट समजला जायचा. राजेश खन्ना यांच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट म्हणजे ‘आराधना’. या सिनेमाने राजेश खन्ना यांच्या करिअरला एक मोठी उसळी दिली. आजही हा सिनेमा आणि यातील गाणी मोठ्या आवडीने पाहिले, ऐकले जातात. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल राजेश खन्ना हा सिनेमा करायला अजिबात तयार नव्हते. जाणून घ्या याचा एक किस्सा आणि ते चित्रपटासाठी कसे तयार झाले याबद्दल.
राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याची त्यावेळच्या सर्वच दिग्दर्शक आणि निर्मात्यांची इच्छा होती. यातलेच एक दिग्दर्शक होते शक्ती सामंत. शक्ती सामंत हे ‘आराधना’ चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. त्यांची इच्छा होती की, या सिनेमात राजेश खन्ना यांनी मुख्य भूमिकेत काम करावे.
याच कारणामुळे राजेश खन्ना यांनी हा सिनेमा करायला नकार दिला. पण कुठेतरी शक्ती सामंत यांचा त्यांच्या कथेवर पूर्ण विश्वास होता. हा सिनेमा यशस्वी होणार हे त्यांना मनापासून वाटत होते. शिवाय या चित्रपटासाठी त्यांना एक नवीन आणि साधा मुलगा पाहिजे होता आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या सिनेमात राजेश खन्ना हवे होते.
पण राजेश खन्ना काही केल्या मानेनाच. मग दिग्दर्शकाने राजेश खन्ना यांना सिनेमा फ्लॉप गेला तरी पूर्ण मानधन देण्याचे कबूल केले. तसेही शक्ती सामंत यांनी ठरवले होते की, जर सिनेमा हिट झाला तर चित्रपटाच्या प्रॉफीटमधून कलाकारांना देखील काही भाग देणार. शक्ती सामंतांच्या अनेक प्रयत्नांनी अखेर राजेश खन्ना हा सिनेमा करण्यासाठी तयार झाले.
एका मुलाखतीदरम्यान राजेश खन्ना यांनी सांगितले होते की, जेव्हा ते या सिनेमाची शूटिंग करत होते, तेव्हा त्यांना असे जाणवत होते की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप खास काही करू शकणार नाही. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याने यशाचे झेंडे गाडले. अगदी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या इतक्यावर्षांनी या सिनेमाची गाणी प्रेक्षकांच्या तोंडावर सहज रेंगाळतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
राजेश खन्ना यांना पाहताच सेटवर आलेल्या तरुणींनी केला एकच कल्ला, फाडले होते काकांचे कपडे
पैशाची हाव महागात पडते राव! स्क्रिप्ट न वाचताच राजेश खन्नांनी दिलेला चित्रपटाला होकार, पुढे झाली ‘अशी’ फजिती