Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ये २०२२ कैसा होगा रे’, म्हणत शालूने केला खास व्हिडिओ शेअर, एकदाचा पाहाच

‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. का नाही आठवणार शेवटी तुम्हाला देखील तिच्या प्रितिचा विंचू चावलाच असेल ना ? आता आलं ना ध्यानात! आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या शालूबद्दल. अत्यंत साधीभोळी, दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या चित्रपटापेक्षा सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरूनच खूपच चर्चेत असते. अशातच तिचा २०२२ मध्ये पदार्पण करण्यासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे

राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती अगदी सध्या वेशात दिसत आहे. तिने जांभळ्या रंगाचा एक ड्रेस घातला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘अनदेखा, अनजानासा’ हे गाणे लागले आहे. या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळे हावभाव करताना दिसत आहे. (rajeshwari kharat share her dance video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “ये २०२२ कैसा होगा रे.” तिच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर तिचे असे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. नुकतेच तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

हेही वाचा :

विशाल निकमने पंढरपुरात घेतली शिवलीला पाटीलची खास भेट, बिग बॉसमधील शब्द केला खरा

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सिरीज आणि चित्रपटांबद्दल घ्या जाणून

…म्हणून योगिता तिचे लाल रंगाचे कपडे कधीही घालते, सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट आली चर्चेत 

 

हे देखील वाचा