Tuesday, April 29, 2025
Home मराठी ‘तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी’, पाहा राजेश्वरी कोणासाठी गातीये ‘हे’ गाणे

‘तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी’, पाहा राजेश्वरी कोणासाठी गातीये ‘हे’ गाणे

आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारी मराठी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात दिसते. कधी तिचे बोल्ड अंदाजात फोटो, तर कधी मराठमोळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे.

नुकताच राजेश्वरीने तिचा काळया आणि गुलाबी रंगाच्या साडीमधील एक फोटो तिच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर केला होता. तिच्या या फोटोला प्रेक्षकांकडून खूपच पसंती मिळाली. तिच्या या फोटोनंतर राजेश्वरीने याच साडीत एका भोजपुरी गाण्यावर डान्स करून तो व्हिडिओ देखील शेअर केला होता. तिच्या व्हिडिओला देखील सगळ्यांचे खूप प्रेम मिळाले.

तिच्या या फोटोवर आणि व्हिडिओवर मिळालेल्या प्रचंड प्रेमानंतर आता राजेश्वरीने तिचा याच साडीतील तयार होतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी’ या हिंदी गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील तिच्या कातील नजरेने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिचे हावभाव आणि डोळ्यांच्या नजाकती पाहून कोणीही स्वत:ला तिच्या प्रेमात पडण्यापासून थांबवू शकत आहे. या साडीमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. खूपच कमी वेळात तिच्या या फोटोने खूप लोकप्रियता मिळवली आहे. तसेच या फोटोवर प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंटच वर्षाव केला आहे.

राजेश्वरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिच्या या एकाच चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शालू, तुझा फोटो पाहून काळजाचं पाणी पाणी झालंय गं…’, राजेश्वरीचा नवा अंदाज पाहून चाहते ‘क्लिन बोल्ड’

-आहा! ‘५२ गज का दामन’ गाण्यावर ‘शालू’ने लावले जोरदार ठुमके, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

हे देखील वाचा