Tuesday, July 9, 2024

‘देखू तुझे, सोचू तुझे’, म्हणत ‘शालू’ने लावले जोरदार ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय

आजकाल सोशल मीडिया सगळेच कलाकार वापरतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण सोशल मीडियाशी सर्वात जवळचे नाते असणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तसं पाहायला गेलं,तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. तरीही, तिचा चाहता वर्ग नावाजण्याजोगा आहे. तिचा कोणताही व्हिडिओ शेअर होता क्षणीच व्हायरल होत असतो. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाचा स्लीव्हलेस शॉर्ट ड्रेस घातलेला आहे. यासोबत तिने काळ्या रंगाचे हिल्सचे सॅंडल घातले आहेत. ती या व्हिडिओमध्ये ‘दॅट्स ऑल आय रियली वॉना डू’ या गाण्यावर हावभाव करत डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओला ५० हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच तिचे चाहते सातत्याने हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करून तिच्या व्हिडिओवर कमेंट्स करत आहेत. (rajeshwari kharat’s dance video viral on social media)

राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिचे चाहते देखील तिच्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. तिच्या व्हिडिओवर ते नेहमीच त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात.

राजेश्वरी खरातने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील तिचे शालू नावाचे पात्र चांगलेच गाजले होते. आजही तिला सर्वात शालू या नावाने ओळखतात. त्यानांतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपट काम केले आहे. नुकतेच तिच्या आगामी ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट वेश्या जीवनावर आधारित असणार आहे. यामध्ये राजेश्वरीचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनिल कपूरने लाडक्या रियाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, फराह खानकडून व्हिडिओ शेअर

-‘किती घमंडी मुलगीये…’, पॅपराजींसोबतचे वागणे पाहून नेटकऱ्यांनी आलिया भट्टवर साधला जोरदार निशाणा

-हॉटनेसचा तडका! टीना दत्ताच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पांढऱ्या मोनोकनीत दिल्या हटके पोझ

हे देखील वाचा