Monday, July 1, 2024

‘उप्स! माझा नेकलेस कुठंय?’, म्हणत गुरु रंधावाच्या ‘इशारे तेरे’ गाण्यावर ‘शालू’नं धरला ठेका

सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे कलाकारांना त्यांची खरी ओळख मिळते. चित्रपटातील कामामुळे त्यांची ओळख असतेच. मात्र, सोशल मीडिया असे आहे, जिथून चाहते सहजरीत्या त्यांच्या आवडत्या कलाकारापर्यंत पोहोचू शकतात. अशीच सोशल मीडियावर सध्या जोरदार सक्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. ती सोशल मीडियावर न चुकता तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचा नवीन लूक ती शेअर करत असते. अशातच तिचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राजेश्वरीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने कर्ली हेअर्स केले आहेत. तिने यावर बाकी कोणतीही ज्वेलरी परिधान केली नाही. या व्हिडिओमध्ये ती गुरु रंधावा आणि ध्वनी भानुशाली यांच्या ‘इशारे तेरे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने “उप्स माझा नेकलेस कुठे आहे?” असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहते सातत्याने या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “फँड्री चित्रपट पाहून वाटलं नव्हतं की, तू एवढी छान दिसशील.” सर्वात खास गोष्ट म्हणजे या व्यक्तीच्या कमेंटवर राजेश्वरीने हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. तसेच अनेकजण तिच्या या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. (rajeshwari kharat’s dance video viral on social media)

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिचे शालू हे पात्र खूप गाजले होते. या चित्रपटात ती अत्यंत साध्या पेहरावात दिसली होती. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. नुकतेच तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

हे देखील वाचा