Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

राजेश्वरी खरातच्या ‘रेडलाईट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहायला मिळाला शालूचा भयाण लूक

नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून नावारूपाला आलेली मराठी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात होय. राजेश्वरीने जरी जास्त चित्रपटात काम केले नसले, तरी तिचा फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंना आणि व्हिडिओला जोरदार प्रतिसाद देत असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने तिचा आगामी चित्रपट ‘रेडलाईट’चा पोस्टर प्रदर्शित केला होता. अशातच तिने रविवारी (१५ ऑगस्ट) तिच्या या आगामी शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या आगामी शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती काही वाक्य म्हणत आहे. यामध्ये असे म्हणत आहे की, “सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा, पण माझे अश्रू तू विकत घेऊ शकतोस का ? बनते एक स्त्री वेश्या, पण खरंच स्वईच्छेने का? प्रश्न हा सोडवून बघ समाजा, कळेल मग व्यथा वेश्येच्या मागच्या स्त्रीची तुला!” तसेच यामध्ये अनेक वैश्या स्त्रियांची परिस्थिती दाखवली आहे. तसेच ट्रेलरच्या शेवटी राजेश्वरी दिसत आहे. यामध्ये तिचा जबरदस्त लूक दिसत आहे. तिच्या आगामी शॉर्ट फिल्मचा ट्रेलर तर सर्वांना खूप आवडला आहे. पण ती काहीतरी जबरदस्त कहाणी घेऊन येणार आहे, ही गोष्ट या ट्रेलरमधून लक्षात येत आहे.

आपल्या समजत वैश्येला नेहमीच हीन दर्जा दिला जातो. पण त्यांना ती परिस्थिती का स्वीकारावी लागली असेल, त्यांनी ती मनाने स्वीकारली की, त्यासाठी त्यांना कोणी जबरदस्ती केली या गोष्टीचा समाज कधीच विचार करत नाही. अशीच ही एक आगळी वेगळी कहाणी घेऊन राजेश्वरी लवकरच भेटीला येणार आहे. तिने अजूनही ही शॉर्ट फिल्म कधी प्रदर्शित होणार आहे. ही माहिती अजून समोर आली नाही. (rajeshwari kharat’s redlight movie’s trailer release out )

राजेश्वरीने याआधी ‘फॅन्ड्री’ आणि ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तृतीयपंथीयांवर केलेला विनोद कॉमेडियन, अभिनेता असलेल्या वीर दासच्या आला अंगाशी, सोशल मीडियावर मागावी लागली माफी

अरे बापरे! भारती सिंगने भर शोमध्ये ‘या’ स्पर्धकाच्या वडिलांना केले ‘किस’, आईची या प्रकरणावर ‘ही’ होती रिऍक्शन

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

हे देखील वाचा