राजकुमार राव आणि त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंड पत्रलेखा आज लग्न करून, त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात करणार करणार आहेत. १४ नोव्हेंबरला, म्हणजेच आज हे दोघेही त्यांच्या अनेक वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर खास नात्यात करणार आहेत. आज चंदीगडमध्ये, राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाचे सर्व विधी कुटुंबीय आणि काही निवडक मित्रांच्या उपस्थितीत पार पडतील.
लग्नाआधी, त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. अशातच त्यांच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राजकुमार त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. त्यांचा हा साखरपुड्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, जोडप्याचा साखरपुडा चंदीगडमध्येच पार पडला. (rajkummar rao gets down on his knees for patralekhaa and say will you marry me engagement video leak)
‘असे’ केले प्रपोज
एंगेजमेंट रिंग घालण्यासाठी अभिनेता पत्रलेखाला गुडघ्यावर बसवून प्रपोज करताना दिसला. तो फिल्मी स्टाईलमध्ये पत्रलेखाला म्हणाला, “माझ्याशी लग्न करशील का?” हा प्रस्ताव ऐकून पत्रलेखानेही गुडघे टेकले आणि राजकुमार रावला अगोदर अंगठी घातली. यानंतर दोघांनी एकत्र डान्सदेखील केला.
‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ होती साखरपुड्याची थीम
या जोडप्याचा हा व्हिडिओ आणि पाहुण्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी वेन्यूचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पाहुणेही ब्लॅक ऍंड व्हाईट कपड्यांमध्ये दिसत होते. हे फोटो पाहून, असे म्हटले जात आहे की, त्यांनी त्यांच्या साखरपुड्यासाठी ही थीम ठेवली होती.
छोटी आहे पाहुण्यांची यादी
कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत असल्याचे पाहून, राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांचा विवाह सोहळा अतिशय खासगी ठेवला आहे. दोघांनी त्यांच्या पाहुण्यांच्या यादीत काही निवडकांचा समावेश केला आहे. ज्यात कुटुंबातील सदस्य आणि उद्योगातील काही निवडक मित्रांचा समावेश आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे या दोघांनीही आपलं नातं कधीच लपवलं नाही. दोघेही एकत्र अनेक फोटो शेअर करत असतात. मीडियाशी बोलतानाही दोघंही अनेकदा एकमेकांचा उल्लेख करताना दिसले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू
-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…