Tuesday, July 9, 2024

लव्ह मॅरेज करण्याचा विचार करताय? जरा थांबा आणि बघा अभिनेता राजकुमार रावची अवस्था

राजकुमार राव (rajkumar rao)हा बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता मानला जातो. त्याचं चित्रपटात असणं म्हणजे चांगल्या कथेची हमी असते त्याच्या अभिनयाचे चाहते दिवसेंदिवस वाढत आहेत. पण राजकुमार जितका चांगला अभिनेता आहे तितकाच तो एक उत्कृष्ट नवरा आहे आणि पत्रलेखाला प्रत्येक कामात मदत करतो, मग ते काम भांडी धुण्याचे का असेना.

राजकुमार आणि पत्रलेखा (patrlekha) यांचे गेल्या वर्षी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्न झाले होते. हे जोडपे गेल्या ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि इतक्या वर्षांनंतर या जोडप्याने सात फेरे घेऊन या नात्याला नाव दिले. राजकुमार आणि पत्रलेखा यांचे चंदीगडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झाले होते. या लग्नात सर्वकाही स्वप्नासारखे होते. लग्नाचे फोटो पाहता राजकुमार आणि पत्रलेखा एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत हे कळते, त्यामुळेच राजकुमार कामात कितीही व्यस्त असला तरी पत्रलेखाला घरच्या कामात मदत करायला विसरत नाही.

अलीकडेच राजकुमार रावला विचारले गेले की, तो पत्नी पत्रलेखासोबत जबाबदाऱ्या सामायिक करतो आणि घरातील कामे करतो का? अभिनेत्याने उघड केले की तो आपल्या पत्नीला घरातील कामात मदत करतो. राजकुमारने पुढे खुलासा केला की त्याच्याकडे OCD आहे आणि म्हणून तो गोष्टी नीटनेटके ठेवण्यास प्राधान्य देतो.

राजकुमार रावने त्याच्या आवडत्या घरगुती कामांबद्दल सांगितले आणि उघड केले की त्याला भांडी धुणे आणि फरशी झाडणे आवडते. त्याने सांगितले की तो लहानपणी आईला मदत करत असे आणि त्यामुळे ही कामे करण्याची आवड निर्माण झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

श्वेता त्रिपाठीच्या ‘या’ बोल्ड वेबसिरीज पाहणार असाल तर एकट्याच पाहा बरं का!

दीपिका नाही, तर ‘या’ अभिनेत्री होत्या रणवीरच्या जीव की प्राण; यादीवर टाका एक नजर

मुंबईच्या रस्त्यावर पाऊस एन्जॉय करतीये पूनम पांडे, पण नेटकऱ्यांनी का केले ट्रोल?

हे देखील वाचा