Monday, June 17, 2024

अभिनेत्री हुमा कुरेशीचा बोल्ड अवतार पाहून घायाळ झाले नेटकरी, राजकुमार रावच्या पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्या नेहमीच त्यांचे बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करत असतात ज्याची सोशल नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगताना दिसत असते. सध्या अभिनेत्री हुमा कुरेशीचेही असेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) जितकी तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते तितकीच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही प्रसिद्ध आहे. हुमा इंस्टाग्रामवर फोटोंच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचे अपडेट्स देत असते. सध्या हुमाचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर चर्चेचा विषय आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

या फोटोंमध्ये हुमाने पांढऱ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे, ज्याचा पुढचा भाग कट आहे. हुमाने वर चेकचा कोट लावला आहे. या ड्रेसमध्ये तिने स्टाइलमध्ये पोज दिल्याने हॉटनेस वाढला आहे. हुमाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून ते कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर सहकारी कलाकारही हुमा कुरेशीच्या या फोटोवर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.हुमाच्या या बोल्ड फोटोंवर राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाने काय बॉंम्ब आहेस तु म्हणत तिचे कौतुक केले आहे.  इतर अनेक सेलिब्रिटींनी हुमाच्या फोटोंवर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

 

दरम्यान अभिनेत्री हुमा कुरेशीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ती यावर्षी गंगूबाई काठियावाडीमध्ये दिसली होती. या  चित्रपटातील एका गाण्यात तिने खास भूमिका साकारली होती. याशिवाय वलिमाई या तमिळ चित्रपटात हुमाने  मुख्य भूमिका साकारली होती. हुमाच्या आगामी चित्रपटांमध्ये मोनिका, ओ माय डार्लिंग, तरला आणि डबल एक्सएल यांचा समावेश आहे. तिच्या या चित्रपटाची चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा