Saturday, June 29, 2024

राजकुमार अन् पत्रलेखाच्या लग्नातील खास व्हिडिओ व्हायरल, केमिस्ट्री पाहून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूडमधील सगळ्यात रोमँटिक जोडप्यांपैकी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. १५ नोव्हेंबर रोजी त्यांनी सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या लग्नाच्या इतर फोटोंची त्यांचे चाहते अजूनही वाट बघत आहेत. अशातच त्यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे.

राजकुमार रावने त्यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राजकुमार आणि पत्रलेखा यांची सुंदर केमिस्ट्री दिसत आहे. त्याच्या लग्नातील हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खूपच खुश झाले आहेत. या व्हिडिओची सुरुवात पत्रलेखा राजकुमारला एक खास संदेश देताना होते. ती म्हणते की, “राज मी तुला ११ वर्षापासून ओळखते, पण मला असं वाटतं की, मी तुला आयुष्यभरापासून ओळखते. मला तर असे वाटते, जसे मी तुला अनेक वर्षापासून ओळखते.” यानंतर ती राजकुमारकडे जाते आपल्या पत्नीला बघून राजकुमार जोरात शिट्टी मारतो. (Rajkumar rao share their special wedding video on social media)

पत्रलेखा जेव्हा मंडपात पोहोचते, तेव्हा राजकुमार म्हणतो की, “खरं सांगायचं झाल्यास, ११ वर्षे झालेत आपण डेट करतोय, पण मला असं वाटतंय मी नव्याने आताच तुझ्या प्रेमात पडलोय.” या व्हिडिओमध्ये तो पत्रलेखाच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. त्याचा हा अगदी सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३० लाखांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.

राजकुमारने पत्रलेखाला त्यांच्या लग्नात एक खास गिफ्ट दिले आहे. त्याने तिच्यासाठी जी काही प्रेमपत्र लिहिली होती. ती त्याने त्यांच्या लग्नाच्या दिवशी तिला गिफ्ट दिली आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, परंतु त्याचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तारक मेहता’च्या जेठालालने वाढवली स्पॅनिश पत्रकाराची लोकप्रियता, फोटो शेअर करताच ट्विटरवर वाढले फॉलोव्हर्स

-सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याने बिहारपासून केला सायकलवर प्रवास, अभिनेत्याने फोटो शेअर करून मानले आभार

-अक्षय कुमारने ‘अतरंगी रे’चे मोशन पोस्टर्स केले शेअर, धनुष-साराच्या भूमिकेचा झाला खुलासा

हे देखील वाचा