Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड राजपाल यादवला बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण, आता लवकरच दिसेल त्याच्या ‘टॅक्सी में भूत’

राजपाल यादवला बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण, आता लवकरच दिसेल त्याच्या ‘टॅक्सी में भूत’

राम गोपाल वर्मांच्या (Ram Gopal Varma) १९९९ मध्ये आलेल्या ‘शूल’ चित्रपटातील एक छोटासा सीन आणि त्यानंतर राजपाल यादवने (Rajpal Yadav) बॉलिवूडमध्ये मागे वळून पाहिले नाही. राम यांच्या पुढच्या ‘जंगल’ चित्रपटातील एका भयानक भूमिकेमुळे तो प्रेक्षकांमध्ये एक ओळखीचा चेहरा बनला. त्याला त्या वर्षी फिल्मफेअर बेस्ट परफॉर्मेंस इन निगेटिव्ह भूमिकेचा पुरस्कार मिळाला. राजपालच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. योगायोगाने, त्याच्या नवीनतम बॉक्स ऑफिस रिलीझ ‘भुल भुलैया २’ने प्रेक्षकांना लोटपोट केले. कोरोना नंतरचा हा सर्वात हिट चित्रपट ठरला.

राजपाल यादव हा हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी चेहरा आहे. उत्तम अभिनेत्यासोबतच उत्तम विनोदी अभिनेता म्हणूनही त्याने ओळख निर्माण केली. तो प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे. पडद्यावर राजपाल असेल, तर नक्कीच चेहऱ्यावर हसू येईल, हे चित्रपट पाहणाऱ्यांना माहीत आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर, राजपाल यादवने कॉमेडीमध्ये चांगली छाप पाडली आणि आज त्याच्या खात्यात ‘प्यार तूने क्या किया’, ‘हंगामा’, ‘वक्त’, ‘चुप चुप के’, ‘गरम मसाला’, ‘फिर हेरा फेरी’ ते ‘भूल भुलैया’ यांचा समावेश आहे.

नायकही बनला!
राजपालने नायक म्हणूनही चित्रपट केले आणि तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं’, ‘लेडीज टेलर’, ‘रामा रामा क्या है ड्रामा’, ‘हॅलो हम लल्लन बोल रहे है’, ‘कुश्ती’पासून ‘मैं मेरी पत्नी और वो’पर्यंतचे चित्रपट त्याच्या खात्यात आहेत. नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झालेला त्याचा ‘अर्ध’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. जेव्हा हा चित्रपट राजपालकडे आला आणि निर्मात्यांनी त्याला फी विचारली, तेव्हा त्याने सांगितले की अशा कथेसाठी ‘मी फक्त एक रुपया आणि पंचवीस पैसे घेईन.’

राजपालचे वर्कफ्रंट
राजपाल आता चित्रपट निर्माते विल्सन लुईस यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘टॅक्सी में भूत है’ करण्याच्या तयारीत आहे. चित्रपट प्री-प्रॉडक्शन स्टेजवर आहे. त्याचे शूटिंग पुढील वर्षी होणार आहे. हा एक कॉमेडी रोड चित्रपट आहे, ज्यामध्ये राजपालने मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका केली आहे. ज्याच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, पण त्याला हे आयुष्य जास्त कठीण तेव्हा वाटतं, जेव्हा एका मुलीचं भूत येऊन त्याच्या टॅक्सीत बसतं!

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा