Sunday, June 4, 2023

राजपाल यादवने केले दु:ख व्यक्त; म्हणाला, ‘मला कॉमेडियनचा टॅग आवडत नाही, असे करून लोकांनी मला…’

अभिनेता राजपाल यादवने (Rajpal Yadav) चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तो त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अर्ध’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवळपास २५ वर्षांच्या कारकिर्दीत राजपाल यादवने दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने बहुतांश चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पडद्यावर आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपालला कॉमेडियनचा टॅग अजिबात आवडत नाही. नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान त्याने स्वतः ही माहिती दिली आहे.

राजपाल यादव अलीकडेच कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) स्टारर ‘भूल भुलैया २’ मध्ये कॉमेडी भूमिकेत दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच राजपाल यादवने सांगितले की, मला कॉमेडियनचा टॅग अजिबात आवडत नाही. त्याला त्याने ‘स्मॉल कॅटेगरी’ म्हटले. संभाषणादरम्यान राजपाल यादवने सांगितले की, तो नेहमी स्वतःला मुख्य भूमिकेत पाहतो. जरी तो सहायक पात्र साकारत असला, तरीही तो मुख्य भूमिकेतच पाहतो. हेच कारण आहे की, जेव्हा कोणी त्याला कॉमेडी जॉनरपुरते मर्यादित ठेवते, तेव्हा त्याला आनंद होत नाही. (rajpal yadav does not like the tag of a comedian)

जेव्हा राजपाल यादवला विचारण्यात आले की, तो मुख्य अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आला होता का? यावर तो म्हणाला, “मी फक्त मुख्य भूमिका केल्या आहेत. काही पात्रांचा कालावधी जास्त असतो तर काहींना जास्त ताकद असते. मी सपोर्टिंग रोल करतोय, असं कधीच वाटलं नाही. दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार, आम्ही सर्व कॅमेऱ्यासमोर विद्यार्थी आहोत. त्यामुळे जेव्हा कोणी मला कॉमेडियन म्हणतो, तेव्हा मला आनंद होत नाही.” राजपाल यादव पुढे म्हणाले, “जेव्हा लोक मला या रूपात प्रेम देऊ इच्छितात, तेव्हा मी त्याबद्दल दु:खी देखील होऊ शकत नाही. पण, विनोदी कलाकार म्हणून माझे नाव अगदी छोट्या श्रेणीत टाकण्यात आले आहे, असे मला वाटते.”

राजपाल यादव पडद्यावर कॉमेडी करताना दिसतो. पण प्रत्यक्षात त्याच्या अगदी उलट आहे. राजपाल यादव म्हणतो की, तो खऱ्या आयुष्यात गंभीर आहे, त्यामुळे तो रील लाईफमध्येच कॉमेडी करू शकतो. ‘अर्ध’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट ZEE5 वर १० जून रोजी प्रदर्शित झाला आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैकनेही (Rubina Dilaik) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा