Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड VIDEO| राजू, रॅन्चो आणि फरहानची 3 इडियट्स जोडी पुन्हा एकत्र, पाहाच व्हायरल व्हिडिओ

VIDEO| राजू, रॅन्चो आणि फरहानची 3 इडियट्स जोडी पुन्हा एकत्र, पाहाच व्हायरल व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी  गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा आगामी येणारा ‘काँग्रॅच्युलेशन्स’ या गुजराती चित्रपटामुळे चर्चेत आहे च्याच्या प्रमोशनसाठी अभिनेता एक व्हिडिओ शुट करत आहे. मात्र, अचानकच तिथे अभिनेता आर माधवन आणि आमिर खान ही 3 इडियट्स जोडी बनते. जे सतत आपल्या मस्तीखोर अंदाजात शरमनला खोड्या काढतात ज्यामुळे अभिनेता त्रस्त होतो आणि तिथून निघून जातो.

बॉलिवूडमधील सर्वाधकि गाजलेला चित्रपट 3 इडियट्स (3 Idiots) हा लोकप्रिय चित्रपट (2009) साली प्रदर्शित झाला होता मात्र, आजही चाहते त्याच आवडीने हा चित्रपट पाहात असतता. यामध्ये राजू, रैंचो आणि फरहान या तीन मित्रांची मैत्री आणि समाजाला दिला जाणारा संदेश यामुळे चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली आहे. एवढ्या दिवसानंतर आमिर खान (Amir Khan), आर माधवन ((R Madhavan) आणि शरमन जोशी (Sharman Joshi) पुन्हा ही जोडी एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे शरमनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शरमन त्याचा आगामी येणारा चित्रपटाबद्दल सांगत असतो तेव्ढ्यातच आर माधवन येतो आणि शरमनची गळा भेट घेतो आणि विचारतो की, ‘काय करतो?’ तेव्हा शरमन म्हणतो की, ‘मी माझ्या ‘कन्ग्रैचलैशंस’ चित्रपटच्या प्रमोशनसाठी व्हिडिओ बनवत आहे’ माग माधवन म्हणतो की, ‘अच्छा ठीक आहे तु व्हिडिओ बनव.’ मग शरम पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात करतो की, लगोच आमिर खान येतो त्याला पुन्हा डिस्टर्ब करतो. आमिर देखिल सारखाच प्रश्न करतो आणि मग शरमन सांगतो की, ‘कन्ग्रैचलैशंस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हिडिओ बनवत आहे, जी आजच प्रदर्शित होणार आहे.’

 

View this post on Instagram

 

मग आमिरही  थांबतो आणि शरमन पुन्हा एकदा व्हिडिओ बनण्यास सुरुवात करतो तेव्हा आमिर त्यची मस्ती करत त्रास द्यायाला सुरुवात करताना दिसत आहे. शेवटी शरमान त्यांना त्रासून आपला कॅमेरा उचलून तिथून निघून जातो. हा एक फनी प्रमोशन व्हिडिओ शेअर करत शरमनने कॅप्शनमद्ये लिहिले की, “3 इडियट्स कन्ग्रैचलैशंसचं प्रमोशन करत आहेत.” या तिघांची जोडी तर चाहत्यांची फेवरेट आहेच अशातच हा व्हिडिओ देखिल सोशल मीडियावर क्रेज करत आहे. त्याशिवाय काही चाहत्यांनी ‘3 इडियट्स 2’ची देखिल मागणी केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
माझे संगीत शोधत आहे, कायमचे आणि नेहमी! स्मिता गोंडकरचे लेटेस्ट फोटो
अभिनयाचा वारसा असूनही अभिषेक बच्चनला करावा लागला होता चित्रपटसृष्टीत संघर्ष, वाचा त्याची कहाणी

हे देखील वाचा