Thursday, March 30, 2023

धक्कादायक! राजू श्रीवास्तव यांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह? अज्ञात इसमाने खोलीत शिरुन…

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastv) यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. राजूच्या कुटुंबापासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वजण त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागच्या आठवड्यात राजू श्रीवास्तव जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल रोज नवनवे अपडेट समोर येत असतानाच एक गंभीर बाब समोर आली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्याबाबत  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वास्तविक, एक अज्ञात व्यक्ती राजू श्रीवास्तव यांच्या खोलीत पोहोचला. आणि आयसीयूच्या आत कॉमेडियनसोबत सेल्फी काढायला सुरुवात केली. त्या माणसाला पाहून सगळे घाबरले आणि कॉमेडियनच्या सुरक्षेची काळजी करू लागले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीची चौकशी केली आणि राजूच्या सुरक्षेसाठी आयसीयूच्या बाहेर रक्षक तैनात करण्यात आले आहेत. आता परवानगीशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही.

हेही वाचा –

जेव्हा बुरखा घालून विजय देवरकोंडा पोहचला होता त्याचा चित्रपट पाहण्यास, पुढे प्रेक्षकांनी केले ‘असे’ काही
अंजली अरोराचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांची उडाली झोप
गोपी बहूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवोलिनाने घेतलंय फॅशन डिझायनिंगचे शिक्षण, ‘अशी’ झाली करिअरला सुरुवात

 

हे देखील वाचा