Tuesday, July 9, 2024

अंडरवर्ल्डच्या नावाने बॉलिवूडमध्ये उडायचा थरकाप! राकेश रोशन यांच्यावर झाडल्या होत्या २ गोळ्या; ‘या’ गोष्टीमुळे नाराज झाला होता अबू सालेम

सुपरस्टार ऋतिक रोशनचे वडील राकेश रोशन(Rakesh Roshan) या दिवसांत चर्चेत आहेत, तेही त्यांच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्यांसाठी. आत्तापर्यंत प्रत्येकाला वाटत होते की, केवळ ऋतिकच एक चांगला डान्सर आहे. पण राकेश रोशन यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वजण त्यांच्या प्रतिभेने प्रभावित झाले आहेत. राकेश रोशन यांनी बॉलिवूडमधील ‘कोई मिल गया’, ‘करण-अर्जुन’, ‘क्रिश’ यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ते एक चांगले अभिनेताही आहेत. ‘सीमा’, ‘मन मंदिर’, ‘आँखों आँखों में’, ‘बुनियाद’, ‘झुठा कहीं का’, ‘खूबसूरत’, ‘खट्टा मीठा’ यांसारख्या बर्‍याच चित्रपटांत अभिनय करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट देणारे राकेश रोशन, एकेकाळी भीतीच्या छायेत जगत होते. फक्त राकेश रोशनच नाही, तर बॉलिवूडमधील जवळजवळ प्रत्येक अभिनेता आणि दिग्दर्शकाला अंडरवर्ल्डचा धोका होता. अंडरवर्ल्डकडून बॉलिवूडवर नेहमीच दबाव येत असायचा. शाहरुख खानपासून ते गुलशन कुमारपर्यंत प्रत्येकाला अंडरवर्ल्ड डाॅन अबू सालेम आणि छोटा शकील यांच्याकडून धमकीचे फोन यायचे आणि पैशांची मागणी केली जायची.

गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर तर ही भीती अधिकच वाढली. वास्तविक हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा ऋतिक रोशनला ‘कहो ना प्यार है’ मधून बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिषा पटेल दिसली होती. चित्रपटाने यशाचे सर्व विक्रम तोडले. सन २००० मध्ये रिलीझ झालेला हा चित्रपट १० कोटींच्या बजेटमध्ये बनला असून, याने ६२ कोटींची कमाई केली होती.

यानंतर २००१ मध्ये राकेश रोशन यांच्यावर अंडरवर्ल्डच्या लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान राकेश रोशन यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्यावर हा हल्ला त्यांच्याच सांताक्रूझ कार्यालयाबाहेर झाला होता. राकेशवर दोन जणांनी गोळीबार केला होता. राकेश यांच्या ड्रायव्हरने घाईघाईत त्यांना रुग्णालयात दाखल केले.

वास्तविक, राकेश रोशन यांना ठार मारण्यासाठी नव्हे, तर त्यांना धमकावण्यासाठी या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. राकेश रोशन यांना त्यांच्या ‘कहो ना प्यार है’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या नफ्यातील भाग देण्यासाठी, अंडरवर्ल्डकडून धमक्या देण्यात येत होत्या. पण राकेश रोशन यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. यावर अबू सालेम संतापला होता.

अबू सालेमच्या सांगण्यावरून राकेश रोशनवर गोळीबार करणार्‍या दोन जणांपैकी एक शार्प शूटर होता. त्या शूटरचे नाव जान उस्मान खान असे होते. दिल्ली पोलिसांनी त्या नेमबाजाला अटक केली, तेव्हा त्याने स्वत: ही बाब उघडकीस आणली. त्यावेळी दिल्ली डीसीपींनी निवेदनात म्हटले होते की, खानने कबूल केले होते की, त्याने गायक दलेर मेहंदीलाही धमकीचे कॉल केले होते.

या घटनेच्या तीन वर्षांनंतर राकेश यांना पुन्हा अंडरवर्ल्डमधील लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, बदलत्या वेळेनुसार बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डची भीतीही संपुष्टात आली. आज राकेश रोशन आनंदी आयुष्य जगत आहेत. कोरोनाचा काळ संपल्यानंतर ते ‘क्रिश ४’ वरही काम करण्याची शक्यता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाला दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा,18 वेबसाईटवर घातली बंदी
काय लॉजिक आहे राव! यामुळे राकेश रोशन त्यांच्या चित्रपटांची नावे ‘के’ अक्षरावरुन ठेवतात
राकेश रोशन यांनी ‘या’ कारणासाठी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले नाही काम

हे देखील वाचा