Friday, July 12, 2024

काय लॉजिक आहे राव! यामुळे राकेश रोशन त्यांच्या चित्रपटांची नावे ‘के’ अक्षरावरुन ठेवतात

राकेश रोशन हे बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक आहेत ज्यांनी करण अर्जुन, कहो ना प्यार हैं आणि कोई मिल गया सारख्या एकापेक्षा जास्त चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. परंतु राकेश रोशनचे बहुतेक चित्रपट हे ‘K’ अक्षराने का सुरु होतात. या मागचे कारण माहिती आहे का ? चला तर मग जाणून घेऊया काय आहे कारण…….

राकेश रोशनचे ‘K’ अक्षराचे काय संबंध
राकेश रोशन (Rakesh Roshan) आज जरी बॉलीवूडमधील एक यशस्वी चित्रपट निर्माते असले तरी एक काळ असा होता जेव्हा त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नव्हते. माध्यमांच्या वृत्तानुसार, राकेशला त्यादरम्यान एक पत्र मिळाले ज्याने त्याचे आयुष्याची कायापलट झाली. त्याला ते पत्र त्याच्या एका चाहत्याकडून मिळाले होते. ज्याने त्याला सल्ला दिला की, तू तुझ्या चित्रपटांची नावं ‘के’ अक्षरापासून ठेव, कारण या अक्षराने तू ज्या चित्रपटांची नावे ठेवली आहेत ते सर्व यशस्वी झाले आहेत.

राकेश रोशन यांना पत्रात लिहिलेली ही गोष्ट योग्य वाटली कारण त्यांचे ‘खूबसूरत’, ‘खट्टा मीठा’, ‘खानदान’ सारखे चित्रपट हिट झाले आणि या सर्व चित्रपटाच्या नावांची सुरुवात ‘के’ ने झाली होती. त्याचवेळी ‘जग उठा इंसान’ आणि ‘भगवान दादा’ हे त्यांचे चित्रपट होते जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आणि त्यांचे नाव ‘के’ ने सुरू झाली नव्हती.

मग काय होतं, आपल्या चाहत्याचा गोष्ट मान्य करुन राकेश रोशन यांनी ठरवलं की आतापासून ते आपल्या सर्व चित्रपटांची नावं ‘के’ या अक्षरांपासून ठेवणार आहेत. त्यानंतर त्यांनी तेच केले आणि के अक्षरांपासून चित्रपटांचे नाव ठेवत त्यांनी एकापेक्षा जास्त चित्रपट दिले. आणि सर्व बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरले. जसे- ‘कहो ना प्यार है’ आणि ‘क्रिश फ्रेंचाइज’. त्याचबरोबर राकेश रोशनचे नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यामध्ये सामील झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
खरचं की काय? अभिनेत्री उर्वशी रौतेला करणार होती चार मुले असणाऱ्या गायकासोबत लग्न, स्वतः केला खुलासा
कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा MMS व्हिडिओ लीक? व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा
बापरे! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मोडला पाय? वेबसिरीजच्या शुटिंगदरम्यान झाला अपघात

हे देखील वाचा