Monday, July 1, 2024

बिगबॉस १४ मध्ये राड्यांची नेक्स्ट लेव्हल! स्पर्धकांनी केलंय घराचं कुरुक्षेत्र

बिग बॉस जिथून लॉंच झालं तिथून कायम चर्चेचा विषय राहिलेलं आहे. या शोचा फॉरमॅट, त्यात सहभागी होणारे स्पर्धक, या स्पर्धकांचे शंभर दिवसात होणारे राडे हे लोकांना पाहायला आवडतं आणि म्हणून बिग बॉस देखील अशाच स्पर्धकांना या घरात बोलवत असतं.

सध्या बिग बॉसचं १४ वं पर्व सुरू असून सध्या या शोमध्ये भयंकर राडे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बिग बॉस ने आपल्या पूर्वीच्या पर्वांमधील जुन्या स्पर्धकांना घरात पुन्हा एकदा बोलावलं आहे. यामध्ये राखी सावंत, आर्शी खान, विकास गुप्ता या सारख्या स्पर्धकांचा समावेश होता. त्यापैकी राखी सावंतमुळे घरातल्या हॉट घडामोडी सध्या वाढल्या आहेत. कायम घराचा पारा हा वरच चढलेला असतो. आता काय केलं आहे ड्रामा क्वीन राखी ने यावर एक नजर टाकूयात…

बिग बॉस 14 या रिऍलिटी शोमध्ये राखी सावंत आणि निक्की तांबोळी यांच्यातील संघर्ष सतत वाढताना दिसत आहे. यापूर्वीही या दोघींमध्ये भांडण झालं होतं, परंतु आता राखीने थेट शिव्या देण्यापर्यंत मजल मारली आहे. शुक्रवारच्या एपिसोडवर, या दोघांमधील हा वाद एका लेव्हल वे सुरू झाला आणि संपला भलत्याच लेव्हलला… यावेळी राखीने निक्कीला घाणेरड्या शिव्या दिल्या ज्यामुळे निक्की तांबोळी इतकी दुखावली गेली होती की बाहेर येऊन तिला रडूच कोसळलं होतं.

कलर्स टीव्ही ने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे ज्यात आपल्याला स्पष्ट दिसत आहे की राखी सावंत निक्कीची नक्कल करते. ती असंही म्हणतेय की निक्की मुलांना सतत कोपऱ्यात घेऊन जात असते. ती बाथरूममध्ये जाते आणि कचरा उचलते. राखीबरोबर अर्शी खान देखील निक्कीची चेष्टा करताना आपल्याला व्हिडीओ मध्ये दिसते. निक्की देखील राखीला उत्तर तोडीस तोड उत्तर देते. पण जेव्हा प्रकरण प्रमाणाबाहेर जातं तेव्हा निक्की बाहेर येते आणि एकांतात रडत राहते.

राखीच्या या वागण्याला घरातील इतर सदस्यही आता संतापले आहेत. तू नॉमिनेशनपूर्वी हे सर्व का करतेस हे अली गोनी राखीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. सर्व सदस्य सध्या राखीच्या विरोधात आहेत. दरम्यान, राखी आणि मनु पंजाबी यांच्यातही वाद सुरू आहे. वास्तविक, कश्मिरा, अर्शी आणि राखी या निक्की आणि मनुच्या मैत्रीशी नावं ठेवत आहेत. त्यामुळे मनुसुद्धा संतापला आहे. मनु सध्या राखीच्या हातचं जेवणही जेवत नाहीये.

हे देखील वाचा