बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतला (Rakhi Sawant) आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. राखी सावंत कधीच बातम्यांमध्ये येण्याची संधी सोडत नाही. राखी जिथे जिथे कॅमेरा पाहते, तिथे तिथे ती आपल्या मस्तीखोर स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. राखी सावंत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे, परंतु तुम्ही राखी सावंतला अद्याप कोणत्याही भोजपुरी चित्रपटात किंवा गाण्यात पाहिले आहे का?
जर नसेल, तर तुम्ही राखीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स चुकवलाय. पण त्याबद्दल खेद करू नका. पण राखी सावंतचा भोजपुरी सिनेमातील व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राखी सावंत या व्हिडिओमध्ये पवन सिंग (Pavan Singh) आणि रवी किशन (Ravi Kishan) यांच्यासोबत जोरदार नाचताना दिसत आहे. राखी सावंत, पवन सिंग, रवी किशन यांच्या भूमिका पाहण्यासारख्या आहे. (rakhi sawant bhojpuri item song viral)
गाण्यात टोन्ड फिगर दाखवत राखी सावंतने खूप धमाल केली आहे. पवन सिंग आणि रवी किशन यांची नजर पुर्ण व्हिडिओमध्ये तिच्या कमरेवर खिळलेली दिसत आहे. तर तिकडे राखी सावंतही त्यांना नशा चढवण्यात मग्न आहे. राखी सावंत नेहमीच तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते.
व्हायरल होत असलेल्या या गाण्याचे टायटल ‘पीला पीला जवनिया के जूस’ असे ठेवण्यात आले आहे. हे गाणे लवकरच ३ मिलियनचा टप्पा पार करणार आहे. सध्या या गाण्याला २.९ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










