ड्रामा क्वीनचा ताज मिळवलेल्या राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड असलेल्या आदिल खानशी लग्न केल्याच्या गौप्यस्फोट केला आणि एकच खळबळ उडाली. राखी आणि आदी हे मागील बऱ्याच काळापासून एकत्र होते. मीडियामध्ये देखील त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जायचे. आता या दोघांनी लग्न केले असून, त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोघानी मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केले असून, त्यांचे सर्टिफिकेट देखील या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
आता राखीने आदिलसोबत लग्न केल्यानंतर तिच्या लग्नाच्या फोटोंसोबतच तिने निकाह केल्याचे देखील सर्टिफिकेट देखील व्हायरल होत आहे. यावरून तिने अदिलशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला असे सांगितले जात आहे. राखी हिंदू तर आदिल मुस्लिम असल्याने राखीने त्याच्यासोबत धर्म बदलून लग्न केल्याचे सांगितले जात आहे. राखीच्या व्हायरल होणाऱ्या निकाह पत्रावर तिच्या नाव फातिमा ठेवल्याचे देखील आपल्या लक्षात येईल. यासोबतच तिच्या निकाह पत्रावर तिच्या निकाहची तारीख २९ मे २०२२ लिहिलेली दिसत आहे. तर आता यावरून तिने सात महिने आधीच लग्न केले असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र याबद्दल अजून त्यांनी काहीही सांगितलेले नाही. शिवाय नेटकऱ्यांना हा देखील प्रश्न आहे की, तिने फातिमा नाव ठेऊन धर्म बदलला आणि मग लग्न केले का?
View this post on Instagram
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये जर त्यांचे मॅरेज सर्टिफिकेटमध्ये त्यांच्या लग्नाची तारीख २९ मे २०२२ असल्याने जर त्यांनी सात महिने आधी लग्न केले तर आता का जाहीर केले? हे देखील विचारले जात आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राखीने आता तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून देखील त्यांच्या कोर्ट मॅरेजचे फोटो पोस्ट केले आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “शेवटी…मु खूपच उत्साहित आहे आणि मी माझ्या प्रेमासोबत लग्न केले.अदिलसाठी माझे प्रेम कोणत्याही अटीशिवाय कायमस्वरूपी असेल.” तिच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. यात राजीव अदातिया, प्रतीक सहजपाल, महिमा चौधरी, जसलीन मथारू, अक्षय केळकर, किरण राठौर, कृष्णा मुखर्जी आदि अनेक कलाकारांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच ‘मूड बना लिया’ गाण्याने घातलाय धुमाकूळ! पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘जल्लोष संपण्याचं…,’
आदिलसोबत लग्नावर राखी सावंतने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मी खूप….’










