Saturday, July 6, 2024

‘मला फ्रिजमध्ये जायचं नाही..’, राखीच्या गंभीर आरोपावर आदिल सांतप व्यक्त करत म्हणाला, ‘मलाही सुशांत राजपुत..’

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्धी झोतात आसलेली अभिनेत्री राखी सावंतबिग बॉस मराठी पर्व 4‘मधून बाहेर आल्या पासून वेगवेगळ्या कारणासाठी चाहत्यांचे लवक्ष वेधत आहे. नुकतच राखीची आई जया सावंत यांच्या निधनामुळे अभिनेत्रीवर मोठं संकट कोसळलं होतं त्यामुळे अनेक बॉलिवूड कालाकारांनी तिला सावरलं. मात्र, सध्या अभिनेत्रीवर तिचा पती आदिल दुर्रानी मुळे मोठं संकट कोसळलं आहे. लग्नाच्या काही दिवसताच यांच्या नात्यामध्ये वाद निर्माण झाले आहेत. त्याशिवाय राखीने आदिलवर अनेक मुलींसबोत अफेअर असल्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आलस्याचं सांगितलं होतं. मात्र, या सगळ्यांवर आता आदिलनेही मौन सोडलं आहे.

आईचं निधन झाल्यावर राखी सावंत (Rakhi Saewant) वर मोठं दु:खाचं डोंगर कोसळलं होतं. यामध्येच राखीने रडताना लग्न तुटल्याचंही दुःख व्यक्त केलं आहे. तिच्या मते तिचा पती आदिल दुर्रानी (Adil Durrani) याचे अनेक मुलींसह संबंध आहेत त्यामुळे त्याने त्यांचं नातं लपवून ठेवण्यासाठी सांगितलं होतं. राखी म्हणाली की, “मी त्याला एकदा दोनदा नाही तर तबब्ल 10 वेळा प्रामाणिक राहाण्याची संधी दिली होती पण तो माझ्याशी तसंच वागला. मला जी लोकं न्हणातात की, घरच्या गोष्टी घरीच ठेव त्यांना हेच सांगायचं आहे की, मला फ्रीजमध्ये जाण्याची वेळ येऊन द्याची नाही.”

राखीने दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडचं उदाहरण दिलं आहे. श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीच्या बॉयफ्रेंडने तिचा खून करुन शरीराचे 35 टुकडे करुन जवळपास सहा महिन्यापर्यत घराजवळच्या जंगलात आजूबाजूला फेकले होते.

आदिलनेही राखीच्या आरोपांवर मौन तोडले आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले म्हणाला की, “मी कोणत्याही स्त्रीबद्दल वाईट गोष्टी बोलत नाही म्हणून मी शांत आहे. पण याचा अर्थ असा नाही की, चुकलोय. मी माझ्या धर्माचा आदर करत आहे. मी ज्या दिवशी माझं तोंड उघडेन आणि ती माझ्यासोबत काय वागतेय हे सांगेल तेव्हा ती कधीच स्वतःचं तोंड उघडू शकणार नाही.”

 

View this post on Instagram

 

आदिल पुढे म्हणाला की, “ती रोजच लोकांसमोर येऊन मी वाईट आहे असं सांगते आणि म्हणते की मला फ्रीजमध्ये जायचं नाही पण मी सुद्धा हे म्हणू शकतो की मला सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) व्हायचं नाही. राखी मीडियाला माझ्याशी बोलू देत नाही कारण तिला माहित आहे की मी येऊन सगळं खरं सांगून टाकेल.”

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी मे महिन्यात आपल्या लग्नाला जगजाहीर केलं होतं. त्यंनी (दि, 7 जुलै 2022) रोजीच कोर्ट मॅरेज केलं हेतं. पण 11 जानेवरीमध्ये त्यांनी आपल्या नेत्याची कबूली दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षरा सिंगने शेअर केला ब्राइडल लूक, एकदा पाहाच
लग्नापूर्वी कियारा अन् सिद्धार्थचा डान्स व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘संगीत झाले…’

हे देखील वाचा