Sunday, April 14, 2024

दु:खद! ‘बिग बॉस’ फेम किरण मानेंच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, पोस्ट शेअर करत म्हणाले…

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस पर्व 4 चे स्पर्धक किरण माने यांनी चांगली खेळी खेळली असून टॉप 3 मध्ये अपूर्वा नेमळेकर आणि मानेंनी स्थान पटकवलं होतं मात्र, विजेता अक्षय केळकरने बाजी मारली. कार्यक्रमाने निरोप घेतला असला तरी सतत बिग बॉस पर्व 4 च्या चांगल्याच चर्चा रंगत असतात. त्यासोबतच मानेंचाही विषय निघत असतो. अशातच मानेंनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झालेले दिसत आहेत. त्याशिवाय यांच्या फॅनफॉलोविंगमध्येही चांगलीच वाढ झाली आहे. नुकतंच त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक भावूक करणारी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे असे दिसून येत आहे की, अभिनेता खूपच दु:खा मध्ये आहेत.

किरण माने यांच्या अगदी जवळच्या मित्राचं निधन झालं आहे ज्यामुळे मानेंना मोठा धक्का बसला आहे. कमी वयातच त्यांच्या मित्राने जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे मानेंनी फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. त्याशिवाय त्यांनी कॅप्शमध्ये लहिले की, “तुका म्हणे मरण आहे या सकळां…भेणें अवकळा अभयें मोल!” हे सगळं मान्य आहे…तरीही समविचारी मित्राचं असं अकाली, अनपेक्षित, अपघाती जाणं लै लै लै जिव्हारी लागतं! माझ्यापेक्षा लहान होतास मानस…अजून खूप काही करायचं होतं. खूप जगायचं होतं.”

मानेंनी पुढे लिहिले की, “माझ्या अनेक पोस्टस् वाचून तुझे येणारे कौतुकाचे, चिकीत्सेचे, विश्लेषणाचे मोठ्ठाले फोन्स, लांबलचक मेसेजेस, भरपूर गप्पा.. आणि शेवटी,”नाशिकला आल्यावर घरी या सर” हे सगळं सगळं सगळं खूप मिस् करेन. एक दिवस तुला आदरांजली वहाण्याची पोस्ट करावी लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुझ्यासारख्या विवेकी, संयमी, अभ्यासू मित्राची अशी एक्झीट सहन होत नाही गड्या… लै खचल्यासारखं वाटतंय… ????

किरण मानेंच्या या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांनी देखिल त्यांच्या मित्रासाठी श्रद्धांजली वाहिली आहे, त्याशिवा अभिनेत्यासाठी देखिल सांत्वना व्यक्त केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पॅपराझींना पाहताच नेहा कक्करने ठोकली धूम; म्हणाली, ‘जेव्हा माझा अवतार..’
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातची हळद दणक्यात पडली पार, बेभान होऊन नाचली नवरीबाई

हे देखील वाचा