Wednesday, July 3, 2024

राखी सावंतची सुटका! पोलिस चौकीतून बाहेर पडताच अभिनेत्री म्हणाली, ‘मी फक्त माझ्या….’

टीव्ही क्षेत्रामधील आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत हिला काल गुरुवार (दि, 19 जानेवारी) रोजी आंबोली पोलिसांनी मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला होता. काल दिवसभरात सहा तास तिची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी राखीची सुटका केली आहे. अशातच माध्यमांशी संवाद साधताना तिने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सावंत (Rakhi Sawant) तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्या सोबत लग्नामुळे ती खूपच चर्चेत होती. अशातच तिच्या अटकेची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. राखीला अटक केल्यानंतर अभिनेत्रा शर्लिन चोप्रा हिने तिच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट शेअर करत ही बातमी सर्वत्र पसरवली होती. मात्र, आंबोली पोलिसांनी काल राखीची दिवसभर चौकशी केल्यानंतर तिची सुटका केली आहे.

पोलिस चौकतून बाहेर आल्यानंतर राखीने माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाली की, “जय महाराष्ट्र, जय भारत, मी फक्त माझ्या आईला भेटायला रुग्णालयात आले आहे. मला डॉक्टरांचा फोन आला की, माझ्या आईची तब्येत गंभीर झाली आहे, तिची प्रकृती ठिक नाही. मला चक्कर येत आहे, माझा बीपी लो झाला आहे, मी दिवसभर जेवणही केलेलं नाही.” त्यावेळी राखी त्रस्त होती त्याशिवाय तिने बुरखा परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

राखी सावंतला आंबोली पोलिसांनी 833/2022 या क्रमांकाच्या एफआयआरच्या प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणात राखी सावंतने मुंबई सत्र न्यालयात जामिनासाठी अर्ज देखिल केला होता.मात्र, राखीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने राखीला अटक करण्यात आली होती. आता हे प्रकरण अजून कोणतं नवीन वळन घेइल हे पहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी
अनंत अंबानी आणि राधिकाच्या साखरपुड्यात सलमान खानची डॅशिंग एंट्री, पहाच व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा