Friday, April 19, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी

देशातील सर्वात मोठे उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलाचा अनंतचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. अनंतने उद्योगपती असलेल्या वीरेन मर्चंट यांच्या मुलीसोबत राधिका मर्चंटसोबत साखरपुडा केला आहे. हा साखरपुडा मुकेश आणि नीता अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या घरी पार पडला. यावेळी गोल धना आणि चुनरी असे विधी केले गेले. या समारंभासाठी संपूर्ण अंबानी परिवारासोबतच देशातील अनेक मोठ्या हस्ती आणि बॉलिवूड, क्रिकेट जगातील हस्तींनी त्यांची हजेरी लावली. या सर्वांनी अंबानी आणि मर्चंट कुटुंबाच्या आनंदात सहभागी होत अनंत आणि राधिका यांना शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला संपूर्ण अंबानी कुटुंब हे रॉयल दिसत आहे. क्लासी आणि एलिगंट लूकमध्ये अंबानी कुटुंबातील सर्वानीच लोकांचे लक्ष वेधून घेतले. या साखरपुड्याला अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांनी देखील हजेरी दाखवली. यावेळी अनिल अंबानी यांनी पिंक रंगाचा कुर्ता तर टीना अंबानी यांनी गोल्डन रंगाची साडी नेसली होती. सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर देखील याला कार्यक्रमाला पोहचले. सचिनने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाची शाल परिधान केली होती. तर पत्नी अंजलीने पटोला प्रकारात साडी नेसली होती. यावेळी साधा मेकअप करुन अंजली यांनी त्यांचा लुक पूर्ण केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंटला सलमान खाननेही हजेरी लावली. सलमान निळ्या रंगाचा कुर्ता घालून या कार्यक्रमात पोहोचला. त्याच्यासोबत त्याची भाची अॅलिझेह अग्निहोत्री ऑफ व्हाइट रंगाचा लेहंगा परिधान करून आली होती. यासोबतच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह, गौरी खान आणि आर्यन खान, अक्षय कुमार, सारा अली खान, कॅटरिना कैफ, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, ख़ुशी कपूर, अर्जुन कपूर, वरून धवन, नताशा धवन, करण जोहर, नितु कपूर, किरण राव, आदित्य ठाकरे आदी जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार या साखरपुड्याला पोहचले होते. या साखरपुड्यात खास आकर्षण ठरली ती ऐश्वर्या राय आणि आराध्य बच्चन या मायलेकीची जोडी. दोघी नेहमी सारख्या अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

तत्पूर्वी अनंत आणि राधिका हे लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. अनंत यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डाचे सदस्य म्हणून काम केले. ते सध्या आरआयएल एनर्जी बिझनेसचे नेतृत्व करतात. तर राधिकाने आपले शालेय शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल तसेच मुंबईच्या इकोले मोन्डिएल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले. राजकारण आणि अर्थशास्त्रात न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवी घेतली. ती आता एनकोअर हेल्थकेअरच्या मंडळात संचालक आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा