राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’


‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री राखी सावंत ही मनोरंजनाचा फुल तडका आहे. जिथे कुठे जाईल तिथे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी ती सोडत नाही. म्हणूनच की काय तिला बॉलिवूडची ड्रामा क्वीन असे संबोधतात. आजकाल तर ती नेहमीच रस्त्यावर, कॉफी शॉपमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात स्पॉट होत असते. ती दिसताच प्रेक्षक तसेच पॅपराजी आपसूकच तिच्याकडे आकर्षित होतात. ती देखील कधीच चाहत्यांना आणि पॅपराजींना नाराज करत नाही. नेहमीच त्यांच्या प्रश्नाची ती उत्तरं देत असते. अशातच राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल भयानीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत पॅपराजींसमोर राज कुंद्रा प्रकरणाबाबत तिचे मत मांडताना दिसत आहे. यावेळी ती म्हणते की, “जे तुमच्या दुकानात विकतात लोकं त्याचीच मागणी करतात ना. जर तुम्ही पिझ्झा विकत असाल, तर लोक तुमच्याकडे पिझ्झाचं मागणार ना?? ज्या मुली साडी घालून भारतीय नारी बनून बसतात, त्याचे बॅकग्राउंड बघा. त्या नंतरच कोणालाही जज करा. राज कुंद्राने मला का ऑफर केली नाही किंवा इतर कोणत्या साध्या मुलीला का नाही केली. मी एक परफॉर्मर आहे, एक अभिनेत्री आहे डान्सर आहे. ज्यांना माझ्या सोबत व्हिडिओ करायचा आहे, ते व्हिडिओ करतील. बाकी गोष्टी तर मी काही करत नाही.”

राखी सावंतचे हे बोलून ऐकून एक पॅपराजी म्हणतो की, “व्हिडिओ म्हणजे डान्स व्हिडिओ.” यावर ती हसत म्हणते की, “हो छोटु जी डान्स व्हिडिओ” आणि त्याच्या पाया पडताना दिसली आहे. यानंतर ती सांगते की, राज कुंद्राने काहीच केले नाही आणि तो लवकरच सुटणार आहे. तिने हे देखील सांगितले की, शिल्पा शेट्टी तिच्या खूप जवळची आहे. (Rakhi Sawant give her opinion about raj Kundra’s case to paparazzi)

राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या आधी राखी सावंत ‘मेरे ड्रीम मैं तेरे एंट्री’ या गाण्यात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लाल कमाल!! सारा अली खानने शेअर केले लाल लेहंग्यामध्ये फोटो; पाहायला मिळालं अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य

-खरंच की काय! ऐश्वर्या राय होणार दुसऱ्यांदा आई? व्हायरल फोटो पाहून सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा

-‘गुड्डी माझी सर्वात मोठी फॅन होती…’ म्हणत, धर्मेंद्र यांनी जया बच्चनसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा


Leave A Reply

Your email address will not be published.