ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत ही कायमच चर्चेत असते. मात्र, काही दिवसांपासून अभिनेत्री तिचा पती आदिल दुर्रानीमुळे सतत सोशल मीडियावर ट्रेंड करत असते. (दि, 28 जानेवारी) रोजी राखीची आई जया बच्चन यांचं निधन झालं होतं. त्यावेळीच आदिलच्या नात्यासोबतचा राखीने हंबरडा फोडला होता. त्याशिवाय राखीने मीडियासमोर आदिलचं बाहेर अफेअर असून त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही जगजाहीर केलं होतं. यानंतर तिने पैसे आणि दागिणे पळवण्याचाही आरोप आदिलवर केला होता. असं सगळं असताना नुकतंच राखीचा एक व्हिडिओ समोर येत आहे ज्यामध्ये दोघे नवरा-बायको हॉटेलमध्ये एकत्र जेवताना दिसत आहेत.
मॉडेल आणि अभिनेत्रा राखी सावंत (Rakhi Sawant) हिने तिची आई जय सावंत (Jaya Sawant) यांचा मृत्यू झाला होता, तेव्हा तिने आईच्या निधनाचा जबाबदार आदिल दुर्रानी (Adil Durrani)ला ठरवलं होतं. त्याशिवया आदिलने तिला मारहानही केली आहे असाही अरोप केला होता. त्यासोबतच माझे पैसे आणि दागिने आदिलने घेतल्याचाही आरोप लावला होता. आदिल मला सोडून त्याच्या गर्लफ्रेंडकडे राहायला गेला आहे असंही ती म्हणाली होती. मात्र, एवढ्यासगळ्या ड्राम्यानंतर आता नुकातांच एक व्हिडिओ समोर आला आहे.
एवढे आरोप केल्यानंतर राखीने आदिलबरोबर हॉटेलमध्ये बसून रात्रीचं जेवन केलं आहे. नुकतंच इंस्टंट बॉलिवूड या अधिकृत सोशल मीडिया पेजवरुन राखी आणि आदिलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आदिल आणि राखी एकमेकांना घास भरवत जेवताना दिसत आहेत. त्याशिवाय राखीने या व्हिडिओला कमेंटमध्ये सांगितलंय की, “आदिल आला होता माझी माफी मागायला पण मी त्याला माफ केलं नाही.”
View this post on Instagram
आता यांच्या व्हिडिओवर प्रेक्षतकांनी त्यांच्या नात्याला दिखावटी नातंही म्हटलं आहे तर काहींनी त्यांना जोरदार ट्रोल केलं आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ड्रामा काही कळत नाही” तर दुसऱ्याने लिहिले की, “यांनी आपलंच वैयक्तीक बिग बॉस करुन ठेवलं आहे.” तर अशाप्रकारे राखी आणि आदिलच्या नात्याबद्दल लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रीदेवी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चीनमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार त्यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा
ऐश्वर्यावाला सुंदरतेमध्ये मात देणारी ‘सिर्फ तुम’ फेम अभिनेत्री आहे तरी कुठे? जाणून घ्याच