घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा


नवरा आणि बायकोचे नाते जगातील सर्वात जिव्हाळ्याच्या आणि प्रेमाच्या नात्यांपैकी एक आहे. राग, भांडण, मजा, रुसवा अशा सर्वच भावनांचे मिश्रण या नात्यात असते. सोबतच या नात्याला विविध पैलू देखील असतात. या नात्यावर आधारित अनेक विनोद आपण वाचत, ऐकत, पाहत असतो. विविध कॉमेडी शोमध्ये देखील या नात्यावर अनेक विनोद दाखवले जातात. घरात बायकोची असणारी दहशत आणि तिला घाबरून राहणारा नवरा हे चित्र आपल्या खऱ्या आयुष्यात थोड्याफार फरकाने खरे असतेच. सामान्य घरातील नवरा बायकोचे हे चित्र सेलिब्रिटींच्या घरात देखील पाहायला मिळते. नवरा बायको या नात्यासाठी कलाकार काय आणि सामान्य लोकं काय सर्वच सारखे. अशाच एका मोठ्या सेलिब्रिटी कपलच्या घरातील खरी परिस्थिती नुकतीच एका मुलाखतीदरम्यान समोर आली आहे.

हे सेलिब्रिटी कपल आहे बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या बच्चन घराण्यातील. हो ज्युनिअर बच्चन म्हणून ओळखला जाणारा अभिषेक बच्चन देखील बायकोच्या दहशतीखाली घरात वावरत असतो. बच्चन परिवार हा इंडस्ट्रीमधला अतिशय मोठा परिवार आहे. अभिषेक बच्चनने २००७ मध्ये विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्या रायशी लग्न केले असून, त्यांना आराध्या नावाची मुलगी देखील आहे. याच जोडप्यामधील लाही गुपितं एका मुलाखतीदरम्यान अभिषेकची बहीण श्वेता नंदा हिने सांगितली आहे. अभिषेक आणि श्वेता हे दोघं बहीण भाऊ एका शोमध्ये आले असताना, अभिषेकला विचारण्यात आले की, तो सर्वात जास्त कोणाला घाबरतो? आई जया बच्चन की बायको ऐश्वर्या राय?

यावर अभिषेकने लगेच त्याच्या आईचे नाव घेतले. मात्र त्याच्या बाजूला बसल्याने श्वेता नंदाने सांगितले की, आई नाही बायको. अभिषेक घरी आईला नाही तर बायको ऐश्वर्याला सर्वात जास्त घाबरतो. यावर अभिषेकने लगेच “मला प्रश्न विचारला आहे ना? मग तू शांत बस” असे म्हणत श्वेताला शांत केले.

अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही कौटुंबिक लोकं आहेत. दोघेही आपल्या कुटुंबाला मुलीला वेळ देतात. अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट


Leave A Reply

Your email address will not be published.