बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री, ड्रामा क्वीन आणि डान्सर म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) होय. मनोरंजन क्षेत्रात तिने तिच्या विनोद बुद्धीने एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. प्रत्येकवेळी ती प्रेक्षकांचे तिच्या डान्सने आणि अभिनयाने मनोरंजन करत असते. एका सामान्य व्यक्तीपासून ते एक नावाजलेली अभिनेत्री असा प्रवास करणे तिच्यासाठी काही सोपे नव्हते. अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राखी सावंतने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक नवीन चमकणारी लाल रंगाची BMW कार दिसत आहे. तसेच त्यावर केक ठेवला आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे, राखीला ही कार भेट म्हणून मिळाली आहे. हा व्हिडिओ शेअर करत राखीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझी नवीन गिफ्ट कार.” यासोबतच तिने हार्ट इमोजीही बनवले आहे. (rakhi sawant got a new bmw car as a gift shared a glimpse of the post on social media)
आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, चाहत्यांपासून ते सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत. कारण काही महिन्यांपूर्वी राखी एका लक्झरी कार शोरूमबाहेर दिसली होती. जेव्हा पॅपाराझीने तिला विचारले की, ती कार खरेदी करत आहे का, तेव्हा ती म्हणाली होती की, नवीन कार घेण्यासाठी तिच्याकडे ५०-६० लाख रुपये नाहीत.
राखीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहे. २००५ साली आलेले ‘परदेसीया’ हे गाणे सुपरहिट झाले होते. तसेच तिने ‘बिग बॉस १४’ मध्ये देखील भाग घेतला होता. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत खूप भर पडली आणि तिला सर्वत्र ओळख मिळाली. आता देखील ती अनेक ठकाणी स्पॉट होत असते. अनेक मुद्यांवर तिचे मत मांडत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनत असते.
राखीने हिंदी नाही तर मराठीमध्ये देखील काम केले आहे. ती काही मालिकांमध्ये देखील झळकली आहे. राखी नेहमीच तिचे वेगवेगळे अतरंगी आणि विचित्र अवतार करून बाहेर फिरताना दिसते. तिचे हे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










