Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड कंगनाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील वक्तव्याचा राखी सावंतला बसला धक्का! रुग्णालयात करावे लागले दाखल

कंगनाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील वक्तव्याचा राखी सावंतला बसला धक्का! रुग्णालयात करावे लागले दाखल

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटली जाणारी अभिनेत्री राखी सावंत प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडते. अभिनेत्री कंगना रणौत अलीकडेच तिच्या ‘भीक’ च्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगना रणौतच्या या विधानाला अनेक सेलिब्रिटींनी विरोध केला आहे. कंगना रणौतच्या या वक्तव्यावर आता राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. राखीने सांगितले की, तिला खूप मोठा धक्का बसला होता आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कंगना रणौतला चांगलीच ऐकवताना दिसत आहे.

‘भीकमध्येच तुला पुरस्कार मिळाला आहे का?’
राखीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपली आहे. व्हिडिओमध्ये राखी म्हणते की, “मित्रांनो, मी हॉस्पिटलमध्ये आहे. नर्स माझी तपासणी करत आहे. मी आजारी आहे, शॉकमध्ये आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या एका अभिनेत्रीने सांगितले की, आपल्याला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे. आपल्यावर दया केली गेली. तुम्हाला तुमच्या देशावर प्रेम नाही का? मी खूप करते आणि तुम्हीही करत असाल. अशा लोकांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. भीकमध्ये, तर तुला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आपल्या देशाच्या जवानांनी कारगिल जिंकले, त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? मित्रांनो, ज्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत त्यामुळे मी खूप दुःखी आहे.”  राखीच्या या व्हिडिओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

कंगनाच्या विधानावरून उडाली खळबळ
कंगनाने नुकतेच एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात सांगितले होते की, १९४७ मध्ये स्वातंत्र्य नाही, तर भीक मिळाली होती. कंगना म्हणाली की, प्रत्यक्षात २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. तिच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. संगीतकार विशाल ददलानीने कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये भगतसिंग यांचा फोटो आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ”त्या महिलेला आठवण करून द्या, जिने म्हटले की स्वातंत्र्य भीक आहे. वयाच्या २३ व्या वर्षी शहीद भगतसिंग यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली. ओठांवर हसू आणत आणि गाणे म्हणत ते फाशीवर गेले. त्याची आठवण करून द्या, सुखदेव, राजगुरू, अश्फाकुल्ला आणि इतर हजारो ज्यांनी नतमस्तक होण्यास नकार दिला, त्यांनी भीक मागण्यास नकार दिला. तिला ठामपणे आठवण करून द्या, म्हणजे विसरुनही ही चूक पुन्हा करण्याची हिंमत होणार नाही.”

कंगनाने दिले खुले आव्हान
या विधानावर झालेल्या विरोधादरम्यान, कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एका पोस्टमध्ये लिहिले की, “फक्त योग्य वर्णन देण्यासाठी… १८५७ हा स्वातंत्र्याचा पहिला सामूहिक लढा होता आणि सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि सावरकरजींसारख्या वीरांनी दिले. मला माहित नाही, जर कोणी मला माहिती देऊ शकले, तर मी माझे पद्मश्री परत करेन आणि माफीही मागेन. कृपया यामध्ये मला मदत करा.” अशी स्टोरी शेअर करत तिने खुले आव्हान दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा