Tuesday, October 28, 2025
Home बॉलीवूड राखी सावंतला येतीये पती रितेशची आठवण, म्हणतीये ‘बेवफा तेरा पासून चेहरा दिल लगाने के…’

राखी सावंतला येतीये पती रितेशची आठवण, म्हणतीये ‘बेवफा तेरा पासून चेहरा दिल लगाने के…’

अभिनेत्री आणि ‘बिग बॉस फेम राखी सावंत या वर्षी जोरदार चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये भाग घेतल्यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चरचरीत होती.तिने या शोमध्ये तिचा पती रितेश कुमारसोबत एंट्री केली. या शोमध्ये तिने पहिल्यांदा तिच्या पतीची ओळख करून दिली. त्यानंतर त्यांच्या खूप चर्चा होऊ लागल्या. तिने लोकप्रियतेसाठी खोटा पती आणला आहे, असा देखील तिच्यावर आरोप झाला. परंतु तिने नेहमीच रितेश तिचा पती आहे असे सगळ्यांना सांगितले.

परंतु काही दिवसांपूर्वी तिने ती आणि रितेश वेगळे होत आहेत अशी माहिती दिली. परंतु आता वेगळे होऊनच तिला रितेशला विसरणे खूप अवघड होत आहे. त्यामुळे तिने रितेशचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅक ग्राऊंडला ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ हे गाणे लागले आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करून वेगवेगळे अर्थ देखील काढत आहे.

खास गोष्ट म्हणजे राखीने हा व्हिडिओ शेअर करून काहीही लिहिले नाही. या व्हिडिओमध्ये रितेशची वेगवेगळे फोटो दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “तो तुझा पती कधी नव्हताच खोटारडी.” आणखी एकाने लिहिले आहे की, “अफसानाच्या लग्नात राखी एवढी का खुश दिसत होती? आता अचानक पतीची आठवण आली. असे वाटत आहे की, राखीनेच तिच्या पतीला सोडले आहे. सॉरी राखी तुझ्यावर लगेच विश्वास बसत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीने १३ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले होते की, ती आणि रितेश वेगळे होत आहेत.बिग बॉस मध्ये असताना त्यांची जोडी सगळ्यांना खूप आवडत होती. त्यांच्यातील प्रेम आणि मस्ती सगळ्यांना आवडत होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर देखील अनेकवेळा ते एकत्र सोबत व्हायचे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला देखील त्यांनी एकत्र हजेरी लावली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा