अभिनेत्री राखी सावंत (rakhi sawant) नेहमीच काही न काही ड्रामा करत असते. जेणेकरून ती चर्चेत राहील. आता देखील तिने असे काही केले आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अलीकडेच तिचा प्रियकर आदिल दुर्रानीसोबत मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिस स्टेशनच्या बाहेर राखीने पापाराझीशी बोलले जिथे तिने तिच्या माजी पती रितेशवर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी राखी ढसाढसा रडली.
माध्यमांशी बोलताना राखी म्हणाली, “तो माझे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. तो म्हणतो की मी तुला आणि आदिलला उद्ध्वस्त करीन, तुला आणि आदिलला एकत्र राहू देणार नाही.” राखीने सांगितले की, “तीन वर्षांत त्याने माझ्यासोबत खूप गैरवर्तन करून मला हाकलून दिले आणि शिवीगाळ केली. आता तो माझ्या सोशल मीडियावर हल्ला करत आहे. त्याने माझे फेसबुक, इंस्टाग्राम सर्वकाही हॅक केले. तो मला का त्रास देत आहे?”
राखी म्हणाली, “मी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, मी त्याला माफ केले. पण तो मला ब्लॅकमेल करत आहे. मी पोलिसांकडे आलो आहे, ते मला काय विचारतील हे मला माहीत नाही. मला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे की ते मला साथ देतील.” हे सगळं माध्यमांना सांगताना ती मोठमोठ्याने रडत होती. अत्यंत भावुक होऊन ती या सगळ्या गोष्टींचा उलगडा करत होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-