Tuesday, July 9, 2024

राखी सावंतने शर्लिन चोप्राला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘काही लोक मला…’

टीव्ही क्षेत्रामधील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत ही सतत वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असते त्याशिवाय तिला ड्रामा क्वीन या नावानेदेखिल ओळखले जाते. नुकतंच अभिनेत्रीने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यामुळे चांगलीच चर्चेत होती. मात्र, अचानकच तिला पोलिसांनी अटक केल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ माजली होती. राखीने अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ मीडियासमोर दाखवून तिच्या विरोधात अश्लील भाषा वापरल्यामुळे शर्लिनने राखी विरोधात तक्रार नोंदवली होती. त्याशिवाय दोन दिवसांपूर्वी राखीला आंबोली पोलिसांनी अटक केली असून दिवसभर पोलिस स्टेशनमध्ये तिची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी राखीची सुटका केली आहे.

दोन दिवसांपूर्वी राखी सावंत (Rakhi Sawant) हिला आंबोली पोलिसांनी अटक केली असू सहा तास तिची चौकशी केल्यानंतर तिची सुटका केली होती. चौकीतून बाहेर येताच राखी तिच्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती तेव्हा ती खूपच त्रस्त दिसत होती. त्याशिवाय तिचा व्हिडिओ देखिल तुफान व्हायरल झाला होता. गेल्या काही दिवसांपासून राखीची आई जया सांवत (Jaya Sawant) यांच्यावर कर्क रोग आणि ब्रेन ट्युमरच्या आजारावर उपचार सुरु आहेत. अशातच राखीचा अजून एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने पहिल्यांदा शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ने दाखल केलेल्या तक्रारीबद्दल वक्तव्य केलं आहे.

माध्यमाशी संवाद साधत असताना राखी म्हणाली की, “काही लोक मला फसवण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते खूश राहावे अशी मी प्रार्थना करते. आईची प्रकृती मागच्या दोन दिवसांपेक्षा चांगली आहे. डॉक्टरांचं उपचारासाठी आणि जनतेचे प्रार्थनेचे आणि शुभेच्छांसाठी खूप खूप आभार,” असं म्हणत राखीने शर्लिनच्या आरोपांना फेटाळलं आहे. त्याच दरम्यान राखीने तिच्या आईच्या तब्यतेची माहिती देत प्रेक्षकांच्या आभारही मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

पोलिस चौकतून बाहेर आल्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “जगातील सगळ्यात महागडं द्रव्य म्हणजे अश्रू. अश्रूंमध्ये 1 टक्का पाणी आणि 99 टक्के भावना असतात. त्यामुळे कोणालाही दुखावण्याच्या आधी दोनदा विचार करा.” राखीने शेअर केलेल्या पोस्टनंतर असं दिसून येत आहे की, आता राखी देखिल शर्लिनला चांगलच उत्तर देणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गांधी गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाला नेटकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे, आंदोलन करत म्हणाले, ‘तुम्ही नथुराम गोडसे…’
‘…मी आत्महत्या करेल’, शाहरुख खानच्या फॅनने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली धमकी

हे देखील वाचा