Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड ‘…मी आत्महत्या करेल’, शाहरुख खानच्या फॅनने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली धमकी

‘…मी आत्महत्या करेल’, शाहरुख खानच्या फॅनने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली धमकी

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा ‘पठाण’ पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यामुळे त्याचे फॅन्स मोठ्या आतुरतेने त्याची आणि त्याच्या सिनेमाची वाट बघत आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी आधीच धुमाकूळ घातला असून, सिनेमात पुन्हा एकदा दीपिका आणि शाहरुखचा रोमान्स पाहायला मिळणार यामुळे सर्वच खुश आहे. शाहरुख खानचे फॅन्स मागील बऱ्याच काळापासून त्याच्या सिनेमाची वाट पाहत होते. ‘पठाण’ सिनेमाबद्दल लोकांमध्ये असलेली क्रेझ इतकी जास्त आहे, अजून सिनेमाला प्रदर्शित होण्य्साठी आठ दिवस बाकी असले तरी ऍडव्हान्स बुकिंग फुल्ल झालेली दिसत आहे.

यातच आता शाहरुख खानच्या एका डायहार्ड फॅन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या फॅनने तर थेट धमकीच देऊन टाकली आहे. ही धमकी शाहरुख किंवा पठाण विरोधात नाही दिली आहे. सध्या हा एक मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शाहरुख खान, दीपिका आणि जॉन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पठाण’ या सिनेमाची तुफान चर्चा सध्या होत आहे. सिनेमाची तिकिटं ऍडव्हान्स बुकिंग्ससाठी जेव्हा सुरु केली गेली तेव्हा काही तासातच कोट्यवधी रुपयांची तिकिटं विकल्या गेली आहेत. अनेकांना सिनेमाच्या तिकिटांसाठी खूप समस्या येत आहे. ज्यांना सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर लगेच पाहायचा आहे, त्यांना तिकिटं उपलब्धच होताना दिसत नाही.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फॅनचा व्हिडिओ पाहून सर्वच लोकांना आश्चर्य वाटत आहे. या व्हिडिओमध्ये तो फॅन म्हणतो, “जर मी पठाण सिनेमा पाहू नाही शकलो आणि शाहरुख खानला भेटू नाही शकलो तर मी २५ तारखेला या तलावात उडी मारून जीव देईल. यार एक स्वप्न होते शाहरुख खानला भेटायचे आणि पठाण सिनेमा पाहायचे, मात्र पैशांच्या समस्येमुळे मी सिनेमाचे तिकिटं घेऊ शकत नाही, आणि ना ही माझी कोणी मदत करू शकत आहे. मी २५ तारखेला तलावात उडी मारून आत्महत्या करणार आहे, त्यानंतर मी शाहरुख खानला भेटू शकणार नाही. कमीत कमी पठाणचे एक तिकीट तर करून द्या यार.” सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, यावर नेटकरी कामनेट्स देत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य अभिनेत्री शुभ्रा अय्यप्पाने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, पाहा भन्नाट फाेटाे

इंडियन आयडॉलमध्ये रीना रॉयचे कौतुक पडले शत्रुघ्न सिन्हा यांना महागात; पत्नी म्हणाली, ‘तू घरी…’

हे देखील वाचा