Tuesday, July 9, 2024

‘हे तर मोदीजी आणि अमित शहा…’, राखी सावंतचे हेमा मालिनी यांना उत्तर

बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेचं हेमा मालिनी(Hema Malini) यांनी नुकतेच कंगना रणौतच्या मथुरामधून निवडणूक लढण्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा हेमा मालिनी यांनी म्हटले होते की, माध्यमांतील लोक राखी सावंतचे नावही घेतील. यानंतर राखी सावंतचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले. आता यावर राखी सावंत(Rakhi Sawant) हिने प्रतिक्रिया देताना हेमा मालिनी यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेमा मालिनी यांनी म्हटले होतं की, “चांगली गोष्ट आहे, माझा विचार देवावर आहे. देव सगळं जाणतो. कोणी जे इथले खासदार होऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही बनू देणार नाही. तुम्ही लोकांच्या डोक्यात असं काही टाकलंय की एखादा कलाकारच खासदार होईल. तुम्हाला मथुरेत फक्त कलाकारच हवेत. उद्या राखी सावंतलाही पाठवाल.”

 

View this post on Instagram

 

राखीने म्हटलं की, हे तर गुप्त होते. मी आभारी आहे की, त्यांनी माझ्यासाठी हे शब्द बोलले. राखी सावंतने असंही म्हटले की, मी आज आनंदी आहे, खरंतर हे सिक्रेट होते की मी 2024 च्या निवडणुकीत लढणार आहे. हे तर मोदीजी आणि अमित शहा सांगणार होते पण माझं भाग्य म्हणून माझ्या हृदयातली ड्रीम गर्ल, माझी स्वीट हार्ट हेमा मालिनी यांनी याची घोषणा केली की मी निवडणूक लढणार आहे.

राखी सावंत एवढ्यावरच थांबली नाही तर पुढे म्हणाली की, खरंतर मोदीजी आणि अमित शहा माझ्याबद्दल सांगणार होते. मोदीजी असोत किंवा हेमाजी माझ्यासाठी एकच. मी स्मृती इराणी पार्ट २ करणार आहे. मी खूप आनंदी आहे आता मी निवडणूक लढणार. हा मी निवडणूक लढणार आहे. तुम्ही सगळे मला साथ देणार ना? थँक्यू हेमा मालिनीजी तुम्ही माझ्यासाठी इतकं चांगलं वक्तव्य केलेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रेयाकडे आहेत तब्बल ‘एवढ्या’ चपलांचे जोड; आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, ‘दुकानच टाकूया की मग’
आता ‘ते’ पण दाखवू काय?, विमानतळावर पोहोचलेल्या उर्फीचा ट्रोलर्सला जबरदस्त टोला

हे देखील वाचा