Monday, July 1, 2024

‘लोकांना असे वाटते की मी…’, म्हणत राखीने शेअर केले तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. राखीचे डान्स व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसतात. राखी सावंत देखील तिचे विविध कामं चाहत्यांसोबत शेअर करताना कधीच मागे हटत नाही. आजकाल राखी सावंत तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिने चाहत्यांसोबत आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. पण यावेळी तिने तिचा कोणताही डान्स व्हिडिओ नाही, तर तिने ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राखी सावंत पूलमध्ये टू-पीस परिधान करून निवांत बसलेली दिसत आहे. या टू-पीसमध्ये राखी खूपच हॉट आणि बोल्ड दिसत असून, तिचे हे फोटो फॅन्सला चांगलेच आवडत आहेत.

राखी सावंतने तिचे हे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोंसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लोकं असा विचार करतात की, स्विमिंग कॉस्चुम घालू शकत नाही. अर्थातच मी टू-पीस घालू शकते, लोकांना वाटते की, मी खूप लठ्ठ आहे, तुम्हाला असे वाटते का मित्रांनो.” चाहत्यांना राखीचे हे फोटो खूप आवडत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “हॉट हॉट .. यू आर अ ग्रेट शेप” तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “तू खूप कमाल दिसत आहेस.”

राखी सावंतला ‘बिग बॉस’नंतर बरेच प्रोजेक्ट मिळाले. काही दिवसांपूर्वी तिचे ‘ड्रीम में एंट्री’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आता राखी सावंतचे दुसरे गाणे ‘लॉकडाउन’ देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. जे चांगलेच पसंत केले जात आहे. राखी सावंतने ‘मैं हूं ना’, ‘दिल बोले हडिप्पा’, ‘जोरू का गुलाम’, ‘एक कहानी जुली की’ आणि ‘बुढ्ढा मर जायेगा’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

हे देखील वाचा