Friday, July 5, 2024

राखी सावंतने दाखवली दुबईतील आलिशान घराची झलक, बेडरूमपासून बाथरूमपर्यंत सर्व काही आहे आलिशान

राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या खूप चर्चेत आहे. पूर्व पती रितेशवरील आरोप आणि बिझनेसमॅन आदिल खान दुर्रानीसोबतच्या तिच्या नवीन नात्यामुळे ती चर्चेत आहे. अलीकडेच राखी बॉयफ्रेंड आदिलसोबत दुबईला पोहोचली होती, जिथे तिने एक आलिशान घर घेतले आहे. आता तिने चाहत्यांना तिचे घर दाखवले आहे, ज्याचे बाथरूम बेडरूमपासून ते सर्वकाही आलिशान आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, हे राखीचे खरे घर आहे की, इथे ती कोणत्यातरी ब्रँडची जाहिरात करत आहे.

राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच ती बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत व्हॅकेशनसाठी दुबईला पोहोचली होती. जिथे तिने आलिशान घर घेतले. आता तिने आपल्या आलिशान घराची एक झलक दाखवली आहे, ज्याचे आतील भाग पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. (rakhi sawant shows glimpses of her luxury house in dubai)

राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बेबी पिंक कलरच्या साडीत दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती चाहत्यांना तिच्या घराची झलक दाखवत आहे. व्हिडिओमध्ये राखी म्हणतेय, “तुम्हाला दुबईतील माझे आलिशान अपार्टमेंट बघायचे आहे का?” माझी इच्छा पूर्ण झाल्यामुळे, मला देवाकडून आणखी काही नको, असे राखी म्हणत आहे.

तिच्या पांढऱ्या, तपकिरी आणि चॉकलेटी रंगांच्या मॉड्यूलर किचनपासून ते तिच्या मोहक थीम असलेली लिव्हिंग रूमपर्यंत सर्व काही भव्य आहे. तिच्या लिव्हिंग रूममध्ये एक मोठा टीव्ही, निळ्या रंगाच्या किंग साइज खुर्च्या आणि स्काय ब्लू कलरमध्ये काउचेस आहेत, जे. या घराचे रूम, बाथरूम, डायनिंग एरिया सर्व काही शाही आणि मोहक इंटीरियरने आकर्षक बनवले आहे.

अभिनेत्रीने अलीकडेच खुलासा केला आहे की, तिचा प्रियकर आदिल याने दुबईत तिच्या नावावर एक अपार्टमेंट विकत घेतला आहे. आदिलने तिला एक कारही गिफ्ट केल्याचे राखीने सांगितले. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना वाटत आहे की, आदिलने राखीला गिफ्ट केलेले अपार्टमेंट हेच आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा