Friday, May 9, 2025
Home बॉलीवूड बॉयफ्रेंड आदिल खानबाबत राखी सावंतचा मोठा निर्णय, जाणून तुम्हीही व्हाल चकित

बॉयफ्रेंड आदिल खानबाबत राखी सावंतचा मोठा निर्णय, जाणून तुम्हीही व्हाल चकित

राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिचा नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीमुळे सतत चर्चेत असते. आदिल राखीपेक्षा ६ वर्षांनी लहान असून, या दिवसांत एकत्र सुट्टी घालवण्यासाठी दोघे दुबईला गेले आहेत. यादरम्यान राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिलसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

लिव्ह-इनमध्ये राहणार राखी
माध्यमाशी बोलताना राखी सावंत म्हणाली की “होय, आदिल आणि मी सोबत आहोत आणि एकत्रच राहतो. आदिल लवकरच मुंबईला शिफ्ट होऊ शकतो. दुबईच्या ट्रिपवरून परतल्यावर लवकरच आम्ही मुंबईत येऊन एकत्र राहू.” (rakhi sawant to start live in relationship with new boyfriend adil khan durrani)

मुंबईत बिझनेस वाढवतोय आदिल
राखी सावंतने या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “आदिलचा मुंबईत कारचा व्यवसाय आहे आणि तो या शहरात आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. मी आणि आदिल मुंबईत डान्स अकादमी सुरू करण्याचाही विचार करत आहोत.”

आदिलने केले होते राखीला प्रपोज
काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राखी सावंतने त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितले होते की, “हे देवाने माझ्यासाठी पाठवले आहे. रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले. काही बरे वाटत नव्हते. तेव्हाच आदिल माझ्या आयुष्यात आला. त्याने महिनाभरातच मला प्रपोज केले. खरे सांगायचे, तर मी यासाठी अजिबात तयार नव्हतो. पण तो म्हणाला की, तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मग मी पण त्याच्या प्रेमात पडले.”

राखी सावंत तिच्या विधानांसाठी दरदिवशी चर्चेत असते. यामुळेच तिला ‘ड्रामा क्वीन’ म्हटले जाते. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा