बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणे महागात पडले. अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फुंकताना दिसत आहे. मात्र अभिनेत्याच्या या उदात्त कृतीला वेगळ्या नजरेने बघत, नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण आता अनेक लोक त्याच्या बाजूने येत आहेत आणि त्याचे समर्थन करत आहेत.
शाहरुख खानचा व्हिडिओ झाला व्हायरल
शाहरुख खानने नुकतेच लता मंगेशकर यांच्या अखेरच्या निरोपाला हजेरी लावली. त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीही यावेळी उपस्थित होती. लताजींना श्रद्धांजली वाहताना शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो दुआ पाठ केल्यानंतर, पार्थिवावर फुंकर मारताना दिसत होता. यानंतर शाहरुखने लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला स्पर्शही केला. मात्र हा व्हिडिओ पाहून, शाहरुख लतादीदींच्या अंगावर थुंकल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली. (rakhi sawant told media that whether shahrukh khan blow or spit)
राखी सावंतने दिला पाठिंबा
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शाहरुख ‘थुंकला’ असं म्हणत त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावरून वाढत चाललेला वाद पाहता उर्मिला मातोंडकरनंतर (Urmila Matondkar) आता राखी सावंत (Rakhi Sawant) शाहरुख खानच्या समर्थनार्थ उतरली आहे. राखी सावंत त्या लोकांवर चांगलीच भडकली आहे, जे शाहरुख खानवर टीका करत आहेत आणि तो लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला म्हणत आहेत. राखीने त्यांना दुआ पठण आणि फुंकण्याचा अर्थही समजावून सांगितला.
राखी सावंतने सांगितला फुंकण्याचा अर्थ
राखी सावंतने पॅपराझींशी संवाद साधताना सांगितले की, “जे असे टीका करत आहेत, त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे. जेव्हा दुआ केली जाते, तेव्हा तिथे फुंकतात. त्यांनी थुंकले नाही. तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचे आहे. त्या एक सेलिब्रिटी आहेत, आपल्या लेजेंड आहेत. जेव्हा नमाज अदा केली जाते, त्यानंतर फुंकले जाते. याचा अर्थ दुआ कबूल झाली आहे. मग त्यांना स्वर्गात स्थान मिळते. समजलं का? त्यामुळे हे सर्व चुकीचे पसरवू नका. थोडी लाज बाळगा. हे खूप चुकीचे आहे, असे करू नका. जगा आणि जगू द्या. प्रत्येकाची प्रार्थना करण्याची पद्धत वेगळी आहे. कोणी हात जोडतं, कोणी अल्लाहसमोर हात पसरवतं, तर कोणी आशीर्वाद देतात.”
उर्मिलानेही दिला पाठिंबा
उर्मिला मातोंडकरनेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. माध्यमांशी संवाद साधताना ती म्हणाली, “एक समाज म्हणून आपण संपत चाललो आहोत, जेव्हा आपण एखाद्याच्या प्रार्थनेला थुंकणे समजतो. तुम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहात तो जगात देशाचे प्रतिनिधित्व करतो. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर आले असून, ते खेदजनक आहे.”
दरम्यान ६ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या भारतात शोकाची लाट पसरली आहे.
हेही वाचा-