Monday, July 1, 2024

भारीच की! १५ वर्षे जुना वाद विसरून मिका सिंग अन् राखी सावंतने मारली एकमेकांना मिठी

अभिनेत्री राखी सावंत आणि गायक मिका सिंग यांच्यात २००६ मध्ये झालेल्या किसमुळे बरेच वादविवाद झाले होते. त्याच्या वाढदिवशी मिकाने राखीला जबरदस्तीने किस केले, अशी चर्चा सर्व बाजूंनी होती आणि त्यानंतर तो बराच अडचणीतही सापडला होता. राखीने मिकाविरोधात विनयभंगाची तक्रारही नोंदवली होती. यावर मिका म्हणाला होता की, अगोदर राखीने त्याला किस केले.

हे प्रकरण जुने असले तरीही, इंटरनेटवर बर्‍याचदा यावर चर्चा केली जाते. मात्र, आता असे दिसत आहे की, या दोन्ही कलाकारांनी त्यातून मूव्ह ऑन केले आहे. याचा पुरावा नुकत्याच समोर आलेल्या एका ताज्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला आहे, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिठी मारताना दिसले मिका आणि राखी
सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात मीका आणि राखी चक्क मिठी मारताना आणि एकमेकांची प्रशंसा करताना दिसत आहेत. जेव्हा राखी मिकाला तिच्याकडे येताना पाहते, तेव्हा ती म्हणते, “सिंग इज किंग, सिंग इज किंग.” मिकाने सांगितले की, तो तिथून जात होता आणि त्याला राखी दिसली, तेव्हा तो तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता.

राखी म्हणते- ‘आता आम्ही मित्र आहोत’
राखीने मिकाला हेही सांगितले की, सलमान खानने कशाप्रकारे तिच्या आईचा जीव वाचवला आणि त्यांच्यासाठी सर्वोत्तम डॉक्टर आणि उपचारांची व्यवस्था केली. राखीने पॅपराझींना सांगितले की, आम्ही आता मित्र आहोत आणि यावेळी अभिनेत्री गायकाच्या पाया देखील पडली. हे पाहून तिथे उपस्थित पॅपराझी म्हणाले, “अरे अरे अरे.”

‘राखीमुळे हिट झालाय बिग बॉस शो’
गायक मिका पुढे म्हणाला की, राखीमुळे ‘बिग बॉस १४’ हिट झाला होता. त्याचवेळी, कोरोना विषाणूच्या काळात मिका हजारो लोकांना कशाप्रकारे मदत करत आहे, याचे वर्णन करत राखीनेही त्याचे कौतुक केले आणि त्याला ‘मोठ्या मनाचा माणूस,’ असे म्हणाली.

राखीने ‘बिग बॉस १४’ मध्ये चॅलेंजर म्हणून प्रवेश केला होता आणि प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. ती शोच्या अंतिम स्पर्धकांपैकी एक होती. या शोमधून बाहेर पडल्यानंतर, राखीच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा