Tuesday, March 5, 2024

‘रक्षक – इंडियाज ब्रेव्हज चॅप्टर 2’चा फस्ट लुक आउट; ओटीटी डेब्युसाठी सुरभी चंदना तयार

‘असुर’ आणि ‘कोहरा’ या सिरीजनंतर बरुण सोबतीची लोकप्रियता वाढतंच आहे. दरम्यान तो पुन्हा एकदा एक दमदार सिरीजमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रक्षक’ असं या सिरीजचं नाव आहे. ‘रक्षक:इंडियाज ब्रेव्ह्स’च्या निर्मात्यांनी तीन भागांतील सिरीजच्या चॅप्टर 2 ची घोषणा केली आहे, हा भाग देशाच्या शहीदांना श्रद्धांजली आहे. Amazon Mini TV ने नुकताच ‘रक्षक – इंडियाज ब्रेव्हज चॅप्टर 2’ चा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. हा देशभक्तीपर गाथेचा पुढचा भाग प्रेक्षकांना देशभक्ती, अभिमान, शौर्य आणि पराक्रमाच्या प्रवासात घेऊन जाणार आहे.

‘रक्षक – इंडियाज ब्रेव्ह्स'(Rakshak: Indias Braves chapter 2) च्या सिक्वेलच्या घोषणेसोबतच निर्मात्यांनी बरुण सोबतीचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे. दुस-या भागात बरुण सोबती ज्युनियर कमिशंड ऑफिसर नायब सुभेदार सोंबीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. या फस्ट लुकमध्ये तो देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या भावनेने एक रायफल हातात घेऊन आश्वासक दिसत आहे. ही कथा अवर्गीकृत लष्करी मोहिमांच्या सत्य घटनांवर आधारित असल्याचेही सांगितले जात आहे.

कथेबद्दल बोलायचं झालं तर, हा आगामी सिक्वेल कुलगाम ऑपरेशनची कहाणी हायलाइट करणार आहे, त्याचसोबत ही सिरीज नायब सुभेदार सोंबीर सिंग आणि डीवायएसपी अमन कुमार ठाकूर यांच्या शौर्य आणि उत्कटतेवर प्रकाश टाकणार आहे. ही जोडी दहशतवादी आणि इतर धोक्यांपासून देशाला वाचवण्याच्या धाडसासाठी ओळखली जाते. यामुळेच नायब सुभेदार सोंबीर सिंग यांना ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्यात आले होते. तर डीवायएसपी अमन कुमार ठाकूर यांना शौर्यासाठी ‘शेर-ए-काश्मीर’ पदक मिळाले होते. याशिवाय, रक्षक – इंडियाज ब्रेव्हज चॅप्टर 2 मध्ये रोमांचक ॲक्शन सीक्वेन्स आणि भावनांचा रोलर कोस्टर असणार असल्याचेही निर्माते सांगत आहेत.

‘रक्षक – इंडियाज ब्रेव्हज चॅप्टर 2’ मध्ये बरुण सोबती आणि विश्वास किणी मुख्य भूमिका साकारणार आहेत. त्यांच्याशिवाय ‘इश्कबाज’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सुरभी चंदनाही(Surbhi Chandana) या सिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जगरनॉट स्टुडिओ निर्मित, आगामी सिक्वेल लवकरच Amazon Mini TV वर रीलीज होईल. सुरभी चंदनाही या सिरीजतून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.

ही बातमी आणि पोस्टर चाहत्यांसोबत शेअर करताना बरुण सोबतीने(Barun sobati) लिहिले की, “दुसऱ्या रक्षकाचा आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे. लवकरच Amazon Mini TV वर ‘रक्षक इंडियाज ब्रेव्हज: चॅप्टर II’ पाहण्यासाठी तयार व्हा , ज्यात मी नायब सुभेदार सोंबीर सिंगची भूमिका करत आहे.” यावेळी या सिरीजमध्ये काम करताना आलेले अनुभवही त्याने चाहत्यांसोबत शेअर केले. तो म्हणाला,” ‘रक्षक – इंडियाज ब्रेव्हज: चॅप्टर 2’ हा माझ्यासाठी अविश्वसनीय अनुभव होता. मी परिपूर्णत्वाच्या खुप खोल भावनेने भरलेलो आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तीची भूमिका साकारणे ही खुप मोठी जबाबदारी आहे. नायब सुभेदार सोंबीर सिंग यांची भूमिका साकारणे आणि रक्षक: इंडियाज ब्रेव्हज द्वारे Amazon Mini TV वर त्यांची शौर्यगाथा शेअर करणे ही माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे.”

हे देखील वाचा