Saturday, June 29, 2024

‘रणनीति नाही, आता राजनीति होणार!’, बहूप्रतीक्षित ‘रक्तांचल २’ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या नवनवीन वेबसीरिज रोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सीरिजच्या भन्नाट आणि वास्वववादी जीवनावरील कथा प्रेक्षकांना चांगल्याच आवडत आहेत. एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली ‘रक्तांचल’ वेबसीरिज चांगलीच यशस्वी ठरली होती. या वेबसीरिजमधील कथेने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले होते. याचा पुढचा सीझनही येणार असल्याचे त्याचवेळी समजले होते. त्यामुळे प्रेक्षकांना खूप दिवसांपासून या दुसऱ्या पर्वाची उत्सुकता लागली होती. आता या वेबसीरिजचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही वेबसीरिज एमएक्स प्लेअरवरील सर्वात लोकप्रिय सिरीज ठरली होती.

एमएक्स प्लेअरवरील प्रसिद्ध ‘रक्तांचल’ वेबसीरिजचा पुढचा भाग नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तुमच्या मोबाईलमध्ये एमएक्स प्लेअर असेल, तर तुम्हा ही सीरिज मोफत पाहू शकता. गुन्हेगारी जगतावर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये निकितन धीर, क्रांती प्रकाश झा, माही गिल, आशीष विद्यार्थी आणि करण पटेल मुख्य भूमिका साकारणार आहेत.

ही वेब सीरिज उत्तर प्रदेशमधील ९०च्या दशकातील सत्य घटनांवर आधारित आहे. त्या काळात उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांचा संघर्ष यामध्ये दाखविण्यात आला आहे. याच्या शीर्षकात ‘रणनीति नही अब राजनीति होगी’ असे लिहले आहे. त्यावरुन या सीरिजमध्ये राजकारणचा संघर्ष दाखविण्यात आल्याचे दिसत आहे. या सीरिजमध्ये दोन कलाकार त्या सत्य घटनांसंबधित असलेले घेतले आहेत. या सीरिजची कथा मुख्तार अन्सारी आणि डॉन बृजेश सिंग यांच्या संबधित आहे.

अभिनेत्री माही गिल यामध्ये महिला राजकारण्याची भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या डॅशिंग लूकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. बदला, अन्याय, गुन्हेगारी, मारामारी याच विषयावर आधारित ही वेबसीरिज आहे. ‘रक्तांचल २’ मधील दमदार कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरेल.

हेही वाचा-

हे देखील वाचा