Saturday, June 29, 2024

बँड बाजा, बारात घोडा! पुढच्या महिन्यात रकुल प्रीत सिंग अडकणार लग्न बंधनात, लग्नाचा सगळा प्लॅन रेडी

बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul prit singh) आणि निर्माता-अभिनेता जॅकी भगनानी यांच्या लग्नाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला असून पुढील महिन्यात ते गोव्यात लग्न करणार आहेत. सध्या रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी बँकॉकमध्ये एकत्र सुट्टी घालवत आहेत.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 2023 मध्ये लग्न करणार आहेत आणि जॅकी भगनानीचे वडील वासू भगनानी हे लग्न मोठ्या थाटात पार पाडण्यासाठी तयारी करत आहेत. पण आता असे ऐकू येत आहे की, गोव्यात पुढच्या महिन्यात २२ फेब्रुवारीला अत्यंत साध्या सोहळ्यात लग्न होणार असून त्यात काही खास पाहुण्यांनाच आमंत्रित केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकी भगनानीला हे लग्न खूप जवळून ठेवायचे आहे. भगनानी यांचे कुटुंब अतिशय खाजगी असून लग्न खाजगी ठेवू इच्छित असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी बँकॉकमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने बॅचलर पार्टीचा आनंद घेत आहेत. जॅकी भगनानीने 2021 साली रकुल सिंगच्या वाढदिवसाला आपले प्रेम व्यक्त केले होते. रकुल प्रीत सिंगनेही तिच्या वाढदिवसानिमित्त जॅकी भगनानीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. रकुल प्रीत सिंहने जॅकी भगनानीला तिची सर्वोत्कृष्ट आणि खास भेट असल्याचे सांगितले होते.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. 2023 मध्येच दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा होती. आणि, जॅकी भगनानीचे वडील वासू भगनानी या लग्नाला भव्यदिव्य बनवण्याच्या तयारीत आहेत. पण असे सांगितले जात आहे की, दोघेही 22 फेब्रुवारी 2024 रोजी लग्न करणार आहेत. ज्यामध्ये काही खास पाहुण्यांनाच आमंत्रित केले जाईल. जॅकी भगनानीला हे लग्न खाजगी ठेवायचे आहे. मात्र, जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंगकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

नाचों ! ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘देवरा’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करून केली टीझरची डेट जाहीर
पतौडी कुटुंबाने केले नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हे देखील वाचा