आता बॉलिवूड जगतात असा एक टप्पा सुरू झाला आहे, जिथे कलाकार पठडीबाहेरील चित्रपट बनवण्यासाठी उत्सुक आहेत. सर्वसामान्यांच्या समस्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता ही कलाकारमंडळी अधिक उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. म्हणूनच नुकतेच एका अभिनेत्रीने तिच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली, तेव्हा सोशल मीडियावर तिच्या फोटोमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतेच इंस्टाग्रामवर स्वतःचा असा एक फोटो पोस्ट केला आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. तिच्या हातात कंडोमचे मोठे पॅकेट फाटलेले दिसत आहे, ज्यावर ‘छत्रीवाली’ असे लिहिले आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले आहे की, “कोणत्याही हवामानाशिवाय पाऊस पडू शकतो, त्यासाठी तुमची छत्री तयार ठेवा. ‘छत्रीवाली’चा फर्स्ट लुक सादर करत आहे.” (rakul preet singh shared a picture of condom by presenting her movie first look)
या आगामी चित्रपटात रकुल प्रीत सिंग व्यतिरिक्त सुमित व्यास, सतीश कौशिक, राजेश तैलंग, प्राची शाह आणि रिवा अरोरा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रॉनी स्क्रूवाला ‘छत्रीवाली’ची निर्मिती करत असून, नुकतेच लखनऊमध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाशिवाय रकुलप्रीत लवकरच ‘अटॅक’, ‘मेडे’, ‘डॉक्टर जी’ आणि ‘थँक गॉड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
वाढदिवशी केली प्रेमाची घोषणा
रकुल प्रीत सिंगने तिच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने चाहत्यांना एक सुखद बातमी सांगितली होती. रकुल प्रीत सिंगने तिच्या प्रेमाची घोषणा केली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले की, ती बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत आहे. या पोस्टसोबत रकुल प्रीत सिंगने एक गोड फोटोही शेअर केला.
रकुल प्रीत सिंगने हा रोमँटिक फोटो शेअर करताना लिहिले की, “धन्यवाद माझ्या प्रिय… या वर्षी तू मला वाढदिवसाची भेट म्हणून मिळाला आहेस. माझ्या आयुष्यात आणखी रंग भरल्याबद्दल धन्यवाद…मला सतत हसवल्याबद्दल धन्यवाद…आता आम्ही एकत्र आणखी आठवणी जपणार आहोत.” जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंगचा हा फोटो पोस्ट होताच व्हायरल झाला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू
-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…