बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगलाही लॉकडाऊनमध्ये बाकीच्या कलाकारांप्रमाणे घरीच वेळ घालवावा लागत आहे. त्यामुळे, या दिवसांत ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सध्या व्हिडिओद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करण्याबरोबरच ती त्यांना जागरूकही करत आहे.
रकुल प्रीत सिंगने पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती भिंतीवर उलटी लटकून म्हणजेच ‘फॉरवर्ड फोल्ड अगेन्स्ट अ वॉल’ होऊन कपडे घालत आहे. तिचा हा निराळ्या अंदाजातील व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
रकुल प्रीत सिंगने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “सामान्य पद्धतीने कपडे परिधान करून कंटाळा आला होता, तर तुमच्यासाठीही हे कार्य आहे, तुम्हीही हे करा.” असे कॅप्शन देऊन तिने अनेकांना असे करण्याचे चॅलेंजही दिले आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने महाविद्यालयात असतानाच मॉडेलिंगद्वारे कारकीर्दीची सुरुवात केली. तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात कन्नड चित्रपटाद्वारे केली होती. यानंतर तिने अनेक तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही आपला हात आजमावला आहे.
साल 2014 मध्ये ‘यारियाँ’ या चित्रपटाद्वारे रकुलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये ‘अय्यारी’ आणि ‘दे दे प्यार दे’ यांसारखे चित्रपट केले. याव्यतिरिक्त, ‘मरजावा’ या चित्रपटातही रकुल दिसली होती. सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. तसेच, ती ‘इंडियन 2’ आणि ‘अटॅक’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भोजपुरी होळीगीतांची धमाल कायम! ‘निरहुआ’चं नवीन गाणं जबरदस्त व्हायरल
-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड