Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड ‘एनसीबीने आर्यनला सुपरस्टार बनवले’, अं’मली पदार्थ प्रकरणी निर्माते राम गोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया

‘एनसीबीने आर्यनला सुपरस्टार बनवले’, अं’मली पदार्थ प्रकरणी निर्माते राम गोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया

आर्यन खान सध्या अं’मली पदार्थ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. अशात या सर्व गोष्टींचा त्रास शाहरुख खानला देखील होत आहे. आपल्या मुलाला जामीन मिळावा म्हणून त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही. अशात शाहरुखच्या समर्थनार्थ बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे येत असल्याचे दिसत आहे. अनेक जण सोशल मीडियामार्फत त्याच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत. या सर्वांमध्ये आता निर्माते राम गोपाल वर्मा हे देखील पुढे आले आहेत.

आर्यनला एनसीबीने बनवले सुपरस्टार
राम गोपाल वर्मा यांनी शाहरुखचे समर्थन करत एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “एनसीबीला या प्रकरणी काहीच मिळणार नाही. उलट एनसीबी असे करुन आर्यनची लोकप्रियता वाढवत आहे. तसेच ते आर्यनला सुपरस्टार बनवण्यात मदत करत आहेत.”

‘आमच्यासारख्यांचे काय करतील’
पुढे त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, “आर्यन लवकरच या सगळ्यातून बाहेर येणार. त्याच्यावरील आरोपांवरून काहीच सिद्ध होणार नाही. या लोकांनी साधे किंग खानच्या मुलाला सोडले नाही, तर विचार करा तुमच्या आमच्यासारख्यांचे काय करतील.”

शाहरुख पेक्षा जास्त एनसीबीने दिले ज्ञान
एनसीबीविषयी बोलताना पुढे त्यांनी असेही लिहिले की, “मी पैज लावतो की, काही दिवसांनी आर्यन स्वतः म्हणेल, माझे बाबा शाहरुख खान यांच्यापेक्षा एनसीबीने मला जास्त शिकवले आहे. कोठडीमधील अनुभवाची त्याला पुढे खूप मदत होईल. त्याच्या आयुष्यात त्याला या सर्व गोष्टींमुळे खूप काही शिकायला मिळणार आहे.”

शाहरुखच्या चाहत्यांनी एनसीबीचे आभार मानले पाहिजेत
चाहत्यांना संदेश देत ते म्हणाले की, ” शाहरुख चाहत्यांनी एनसीबीचे आभार मानले पाहिजेत कारण तो आता मोठा सुपरस्टार होणार आहे. शाहरुखने आपल्या मुलाला फक्त स्टार बनवले आहे, पण एनसीबीने आर्यनच्या आयुष्यातील तो पैलू दाखवला ज्यामुळे तो आता सुपरस्टार होणार आहे. तसेच आता त्याचे व्यक्तिमत्त्व आणखीन सुधारणार आहे. शाहरुख खानच्या खऱ्या चाहत्यांनी एनसीबीचा विजय असो असे म्हटले पाहिजे.”

शत्रुघ्न सिन्हा देखील शाहरुखच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. त्यांनी देखील मुलाखतीत म्हटले होते की, “आर्यनला टार्गेट केले जात आहे. शाहरुखबरोबर असलेली दुश्मनी त्याच्या मुलावर काढली जात आहे. यामध्ये बाकीचे देखील आरोपी आहेत. पण त्यांच्यावर कोणीच काहीच बोलत नाही. सर्व जण फक्त आर्यन खानबद्दल बोलत आहेत.”

या सर्व प्रकरणामध्ये ऋतिक रोशनने देखील शाहरुखचे समर्थन केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

-ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा